शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘सोफिया’ने आदेश झुगारला

By admin | Updated: March 23, 2016 00:17 IST

नांदगाव पेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत साकारण्यात आलेले पूर्वीचे सोफिया आणि आताच्या रतन इंडिया औष्णिक वीज प्रकल्पाने २७ शेतकऱ्यांवर अन्याय चालविला आहे

२७ शेतकऱ्यांवर अन्याय : एमआयडीसी प्रधान सचिवांच्या पत्राला बगलअमरावती : नांदगाव पेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत साकारण्यात आलेले पूर्वीचे सोफिया आणि आताच्या रतन इंडिया औष्णिक वीज प्रकल्पाने २७ शेतकऱ्यांवर अन्याय चालविला आहे. एमआयडीसीच्या प्रधान सचिवांनी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी अधिग्रहित करण्याचे आदेश दिले असताना या आदेशाची अंमलबजावणी वीज प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी केली नाही. त्यामुळे अन्यायग्रस्त शेतकरी न्यायासाठी जिल्हाकचेरीवर येरझारा मारत आहेत.सोफिया वीज प्रकल्पाने कोळसा वाहतुकीसाठी रेल्वे ट्रॅक निर्माण केला. त्याकरिता १९० शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्यात. मात्र, रेल्वे ट्रॅक पूर्ण झाल्यानंतर २० आर. पेक्षा अधिक जमिनींच्या अधिग्रहणास सोफियाने नकार दिला. २० आर.पेक्षा अधिक जमिनीवर कोणतेही पीक घेता येत नाही. कारण, रेल्वे ट्रॅकसाठी वलगाव ते वाघोली दरम्यानच्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या होत्या. रेल्वे ट्रॅक निर्मितीसाठी आवश्यक जमीन सोफियाने ताब्यात घेतली. मात्र, २० आर. पेक्षा अधिक जमीन घेण्यास सोफियाने चक्क नकार दिला. ही बाब अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या दरबारात मांडली. याप्रकरणात सत्यता तपासण्यात आली. ज्यावेळी रेल्वे ट्रॅक निर्मितीसाठी जमीन अधिग्रहित करण्यात आली तेव्हा एमआयडीसी, जिल्हाधिकारी व सोफिया वीज कंपनीत संयुक्त करार झाला होता. २० आर. पेक्षा अधिक जमीन शिल्लक राहिल्यास ती जमीन सोफिया खरेदी करेल, असे ठरविण्यात आले होते. मात्र, रेल्वे ट्रॅकसाठी जमीन अधिग्रहित केल्यानंतर २७ शेतकऱ्यांजवळ २२ ते २९ आर.पर्यंत जमीन शिल्लक राहिली आहे. जमिनीच्या या छोट्या तुकड्यावर पेरणी करता येत नाही. त्यामुळे ही जमीन सोफिया वीज कंपनीने अधिग्रहित करावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्त २७ शेतकऱ्यांनी केली होती.रक्कम जमा करण्याचे आदेशअमरावती : महसूल विभागाने या जमिनीचे सर्वेक्षण करून ती पेरणी योग्य नसल्याचा विशेष प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. यानुसार एमआयडीसी प्रधान सचिवांनी २९ सप्टेंबर२०१५ रोजी सोफियाला पत्राद्वारे जमीन अधिग्रहणासाठी १ कोटी ४७ लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. परंतु अजूनही सोफिया वीज कंपनीने २७ शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहणासाठी महसूल विभागाकडे रक्कम अदा केली नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयानेसुद्धा वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, या निकामी ठरलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी २७ प्रकल्पग्रस्त शेतकरी न्यायासाठी पायपीट करीत आहेत. (प्रतिनिधी)-ही तर चक्क फसवणूकसोफिया औष्णिक वीज प्रकल्प स्थापन होताना शेतकऱ्यांना मोठे स्वप्न दाखविण्यात आले होते. जिल्ह्यात रोजगाराचे साधन उपलब्ध होईल, याकरिता शेतकऱ्यांनी वीज प्रकल्पासाठी जमिनी दिल्यात. मात्र, रेल्वे ट्रॅक तयार करताना २० आर. पेक्षा अधिक जमीन शिल्लक राहिल्यास ती खरेदी करण्यास नकार देणे म्हणजे शुद्ध फसवणूक होय, असे अन्यायग्रस्त शेतकरी रामेश्वर अभ्यंकर हे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.२७ शेतकऱ्यांच्या २० आर.पेक्षा अधिक शिल्लक जमिनी खरेदी करण्यासाठी सोफिया वीज प्रकल्पाला नोटीसद्वारे अवगत केले होते. याप्रकरणी एमआयडीसी प्रधान सचिवांचे आदेश होेते. अद्याप याप्रकरणी तोडगा निघालेला नाही.- सुरेश बगळे, तहसीलदार, अमरावती.