शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी माना समाजबांधवांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:01 IST

माना समाज हा आदिवासी प्रवर्गात गणला जातो. असे असताना आदिवासी विकास विभागाच्या जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र समितीकडून जात प्रमाणपत्र दिले जात नाही.

ठळक मुद्देजात प्रमाणपत्र द्या : अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र समिती कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: माना समाज हा आदिवासी प्रवर्गात गणला जातो. असे असताना आदिवासी विकास विभागाच्या जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र समितीकडून जात प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे सोमवारी विभागातील पाचही जिल्ह्यातून आलेल्या माना समाज बांधवानी येथील सायंन्सस्कोर मैदान ते ‘ट्रायबल’ जात पडताळणी कार्यालयदरम्यान भव्य अंमलबजावणी मोर्चा काढण्यात आला. दरम्यान माना समाज शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन सादर केले.‘ट्रायबल’ जात पडताळणी समितीकडून सन- २००६ पासून माना समाजातील कर्मचारी, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजुरांवर अन्याय करीत असल्याचा आरोप करण्यात आला. आदिवासी माना जमात मंडळ अमरावती विभाग व आदिवासी माना जमात विद्यार्थी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.माना समाज बांधवाच्या प्रमुख मागण्यांमध्ये माना, मानी, माने, माना कुणबी, मानी कुणबी, माने कुणबी आदींबाबत अवैध ठरविलेल्या जात प्रमाणपत्राचे आदेश मागे घेण्यात यावे. माना समाज बांधवाचे जात वैधता प्रमाणपत्राचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढावे. माना जमातीेचे प्रस्ताव खारीज करून परत केलेले आदेश पुनर्रचित रोस्टर करावे. प्रकरण निकाली काढून जात प्रमाणपत्र वैद्यता निर्गमित करावे. यासंदर्भात कोणते धोरण ठरविले, याची माहिती देण्यात यावी. माना जमातीचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. अशा एकूण ११ प्रकारच्या मागण्यांसाठी माना जमात मंडळाने अंमलबजावणी मोर्चाद्वारा जात पडताळणी समितीसह शासनाचे लक्ष वेधले. नारायण जांभूळे, विजय दांडेकर, सुनील जिवतोडे, आत्माराम चौके, नामदेव रंदई, योगेश श्रीरामे, श्याम धारणे आदी शिष्टमंडळाने ‘ट्रायबल’ जात प्रमाणपत्र समितीला निवेदन देवून विषय निहाय चर्चा केली.