शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदल्यांचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:14 IST

अमरावती : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदलीसंदर्भातील धोरण निश्चित करणाऱ्या समितीने १५ मार्च २०२० रोजी शासनाला अहवाल ...

अमरावती : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदलीसंदर्भातील धोरण निश्चित करणाऱ्या समितीने १५ मार्च २०२० रोजी शासनाला अहवाल सादर केला आहे.. या अहवालावरून शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांची कार्यपद्धती लवकरच जाहीर करण्यात येणार होती. मात्र, १० महिने उलटूनही धोरण जाहीर न झाल्याने जिल्हा परिषद शिक्षकांना पुन्हा ऑफलाइन पद्धतीने बदली धोरणाची भीती निर्माण झाली आहे.

कोरोना संसर्गामुळे सरकार बदली धोरण जाहीर करू शकले नाही. मात्र, आता ग्रामविकास विभाग व शालेय शिक्षण विभागाने धोरण जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी शिक्षक व शिक्षक संघटना करीत आहेत. शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करायच्या की ऑफलाईन, याबाबत अभ्यास गटाचा अहवाल सादर करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. पाच सीईओंच्या अभ्यास गटाने अहवाल सरकारला सुपूर्द केला. बदल्यांच्या नवा पॅटर्न कसा असेल, याची शिक्षकांना उत्सुकता आहे. धोरण लवकर जाहीर न झाल्यास सरपंचपदाच्या निवडीप्रमाणे जनभावना लक्षात न घेता, हा निर्णयही बदलला जाऊन ऑफलाईन बदल्यांना प्राधान्य देण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शासनाला शिक्षक संघटनांनी शिफारशी केल्या आहेत. आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील शिक्षकांच्या बदल्या होणे आवश्यक आहे. या क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना तीन वर्षांचा कार्यकाळ निश्चित करण्यात यावा. तीन वर्षे सेवा झाल्यानंतर त्यांच्या बदल्या स्वतालुक्यात करण्यात याव्या. शिक्षकांच्या बदल्यांमध्ये खो देण्याची पद्धत बंद करून, टक्केवारी ठरवून बदल्या करण्यात याव्या. सर्व संवर्गातील शिक्षकांना समान न्याय देण्यात यावा. नवीन बदली धोरणाची अंबलबजावणी करून या वर्षाला शिक्षकांच्या बदल्या तात्काळ सुरू कराव्या, अशी मागणी राज्यस्तरीय शिक्षक संघटनांनी शासनाला केली आहे.

------------

शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शता आवश्यक आहे. शासनधोरण निश्चित झाल्याशिवाय बदल्यांची प्रक्रिया राबविता येत नाही. मात्र, धोरण निश्चित का होत नाही, हे समजायला मार्ग नाही. एकदा शिक्षकांच्या बदल्या कशा होणार, हे जाहीर झाले की, पुढील वाटचाल सुकर होईल.

-राजेश सावरकर, प्रसिद्धी प्रमुख. राज्य प्राथमिक शिक्षक समिती.