शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

- तर दीक्षांत सोहळा उधळून लावू; संभाजी ब्रिगेड, एआयएसएफचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:14 IST

कुलसचिवांना निवेदन, संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनीच अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा घ्या अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा ...

कुलसचिवांना निवेदन, संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनीच अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा घ्या

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा २१ नव्हे, तर २३ फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनी घेण्यात याव्या, अन्यथा दीक्षांत सोहळा उधळून लावू, असा निर्वाणीचा इशारा संभाजी ब्रिगेड, ऑल इंडिया स्टुडन्ट्‌स फेडरेशनच्यावतीने बुधवारी देण्यात आला. यासंदर्भात कुलसचिव तुषार देशमुख यांना निवेदन सादर करण्यात आले.

संत गाडगेबाबांची जयंती २३ फेब्रुवारी रोजी असताना अमरावती विद्यापीठाने २१ फेब्रुवारी रोजी दीक्षांत सोहळ्याचे आयोजन कुणासाठी केले, असा प्रश्न संभाजी ब्रिगेड, एआयएसएफने उपस्थित केला आहे. अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा दरवर्षी २० डिसेंबर रोजी गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात येतो. मात्र, यंदा कोरोना संसर्गामुळे दीक्षांत सोहळा लांबणीवर पडला. असे असताना विद्यापीठ प्रशासनाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनी दीक्षांत सोहळा न घेता पाहुण्यांच्या तारखेप्रमाणे २१ फेब्रुवारी रोजी घेण्यात येत आहे. गाडगेबाबा यांच्यापेक्षा आमंत्रित पाहुणे मोठे कसे झाले, असा सवाल संभाजी ब्रिगेड, एआयएसएफने उपस्थित केला आहे. गाडगेबाबांची जयंती मोठी की, पाहुण्यांसाठी मॅनेज केलेली तारीख मोठी, विद्यापीठाच्या अधिकारी, प्राधिकारिणीला कळू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत असल्याचे निवेदनातून म्हटले आहे. दीक्षांत सोहळा २३ फेब्रुवारी रोजी आयोजन करून विद्यार्थ्यांना याच दिवशी पदवी, पदकांनी सन्मानित करावे, अन्यथा हा सोहळा उधळून लावू. होणाऱ्या परिणामाला विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शुभम शेरेकर, याेगेश चव्हाण, कैलास चव्हाण, नीलेश सोनटक्के, राहुल खोडके, रोहन देढे, योगेश चव्हाण आदींनी निवेदन सादर केले.