शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सागवान तस्करांचा वनरक्षकावर हल्ला

By admin | Updated: January 13, 2016 00:16 IST

पश्चिम मेळघाटातील बासपाणी येथील शेतशिवारात लपविलेले सागवान पकडण्यासाठी गेलेल्या वनरक्षकावर मंगळवारी सकाळी सागवान तस्कराने हल्ला चढविला.

बासपाणी बीटमधील घटना : शेतात लपविले सागवानचे लाकूडधारणी : पश्चिम मेळघाटातील बासपाणी येथील शेतशिवारात लपविलेले सागवान पकडण्यासाठी गेलेल्या वनरक्षकावर मंगळवारी सकाळी सागवान तस्कराने हल्ला चढविला. यात मिलिंद एम.सावंत (२८, रा. धारणी) गंभीर जखमी झाले आहे. त्याना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या महिन्यात सागवान तस्करानी वनकर्मचाऱ्यांवर हल्ला चढविला होता. त्यामध्ये वनविभागाचे चार ते पाच कर्मचारी गंभीर झाले होते. आता दुसऱ्यादा सागवान तस्करी करणाऱ्या एका शेतकऱ्याने वनकर्मचाऱ्यांवर हल्ला केला आहे. धारणीपासून सात किलोमिटर अंतरावरील बोड वनवर्तुळातील उतावली गावाजवळ हिरा भालू भिलावेकर यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात सागवान लपविलेले असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वनरक्षक मिलींद सावंत व शोभासिंग हा वनमजुर भिलावेकर यांच्या शेतात कारवाई करण्याकरिता गेले होते. दरम्यान आरोपी हिरा भिलावेकर याने अचानक वनकर्मचाऱ्यांवर शेतातील वाकसाने हल्ला चढविला. या हल्यात मिलींद सावंत यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाले. हल्ला करून आरोपीने पळ काढल्यावर वनकर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी विवेक येवतकर यांना माहिती दिली. त्यांच्या माहितीवरून वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश गुल्हाने यांच्यासह काही वनकर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमी सावंतला तत्काळ पोलीस ठाण्यात नेऊन तेथून जवळील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अमरावती येथील इर्विन रुग्णालयात हलविण्यात आले. सावंत यांचे सिटीस्कॅन काढण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरुकरण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला असून आरोपीचा शोध सुरु आहे.