शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटच्या जंगलात धामणची प्रणयक्रीडा; मार्गावरील प्रवासीही थबकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 12:00 IST

Amravati News वेळ दुपारी ३ वाजताची. रस्त्याच्या अगदी कडेला बिनविषारी असलेल्या अंदाजे आठ फुटाच्या धामणाची प्रणयक्रीडा पाहून रविवारी नागरिकही थबकले.

 लोकमत न्यूज नेटवर्क  अमरावती : वेळ दुपारी ३ वाजताची. पावसाची भीती असल्याने बाहेरगावी जाण्यासाठी नागरिकांची व रस्त्यावरून दुचाकी-चारचाकीने वर्दळ सुरू होती. रस्त्याच्या अगदी कडेला बिनविषारी असलेल्या अंदाजे आठ फुटाच्या धामणाची प्रणयक्रीडा पाहून रविवारी नागरिकही थबकले. परतवाडा, सलोना, चिखलदरा मार्गावरील घटना अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केली.

मेळघाटच्या जंगलात कोब्रा, मण्यार, घोणस, फुरसे हे विषारी, तर धामण, कवड्या गवत्या, रेसर (धुलनागीण) अशा अनेक प्रकारचे बिनविषारी सापाच्या प्रजाती आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून धामण सह इतर काही सरपटणाऱ्या प्राण्यांचा मीलन सुरू होतो तो जून महिन्यापर्यंत. रविवारी चिखलदारा सलोना मार्गावर रस्त्याच्या कडेला चार ते पाच फुटांपर्यंत उंच उडणाऱ्या धामणची प्रणयक्रीडा नागरिकांना थांबण्यास भाग पाडणारी ठरली. परिसरातील गुराखी उभे असल्याचे पाहून चिखलदर व परतवाडा जाणारे नागरिकही काहीकाळ तेथे थबकले. नागरिकांचा हल्लकल्लोळ पाहून सलोना येथील सामाजिक कार्यकर्ते कैलाश हरसुले, राजेश कास्‍देकर, अर्जुन कासदेकर, दीपक शेळके, नामदेव गायन आदींनी नागरिकांचा हल्लकल्लोळ न करता शांत बघून निघून जाण्याचा सल्ला दिला.

मिलापसाठी विशिष्ट गंध सोडतात

प्रणय क्रीडा फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होत असली तरी धामण नर-मादी विशिष्ट प्रकारचा शरीरातून एक विशिष्ट गंध सोडतात. त्यातून त्यांचा मिलाप होत असून, नाग-नागीणचा मिलाप सहसा दिसतच नसल्याचे मेळघाटातील सेमाडोह येथील सर्पमित्र भोला कास्देकर यांनी सांगितले.

टॅग्स :snakeसाप