शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तस्करांनी पोखरले वर्धा नदीचे पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 05:00 IST

बोरगाव धांदे या बैलबाजार परिसरातून तसेच रायपूर, कासारखेडा, विटाळा येथील ई-क्लास परिसरातून दररोज रात्रीला रेती तस्करी केली जाते. गुरुवारी सायंकाळी मंडळ अधिकारी देविदास उगले यांच्या पथकाने या भागात एक कारवाई केली. मंगरूळ दस्तगिर पोलिसांची रात्रीला या भागात गस्त घातली जाते. मात्र, रेतीतस्कर पोलिसांना हुलकावणी देत असल्याचे चित्र आहे. 

ठळक मुद्देनायगाव-वडगाव जोड रस्त्यावर खड्डे, दररोज हजारो ब्रास रेती चोरांच्या घशात

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती-धामणगाव रेल्वे : अमरावती व वर्धा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या वर्धा नदीतील जोडरस्ता रेती तस्करांनी पोखरल्याने  धामणगाव रेल्वे तालुक्यातील नायगाव व आर्वी तालुक्यातील वडगाव पांडे या गावांचा दैनंदिन संपर्क तुटला आहे. रेती तस्करांनी नदीत मोठे खड्डे केले आहेत. मंगरूळ दस्तगीरनजीकच्या नायगाव व वडगाव येथील शेतकरी व गावकऱ्यांसाठी नदीपात्रातून जोड रस्ता होता. वडगाव घाट क्रमांक १ मधून अवैध वाळू उपसा करण्यासाठी नदीपात्रातील हा जोड रस्ता तस्करांनी उखडला. यासंदर्भात हटकले असता, वाळू माफियांकडून दमदाटी केली जाते, अशी तक्रार आहे. दोन्ही गावांतील शेतकऱ्यांची नदीच्या अल्याड-पल्याड शेती आहे. जोडरस्त्यामुळे तेथपर्यंत पोहोचणे सोपे होते. मात्र, घाटाचे लिलाव घेणाऱ्यांनी नदीपात्रातील वाळूच्या वारेमाप उपसा करून मोठे खड्डे करून ठेवले. 

पथक दाखल होत असल्याची टीप धामणगाव तालुक्यातील नायगाव, दिघी महल्ले, बोरगाव धांदे, आष्टा, चिंचोली, गोकुळसरा, सोनोरा काकडे, रायपूर, कासारखेडा ही गावे वर्धा नदीच्या काठी येतात. नदीतून दररोज रात्रीला रेतीचे उत्खनन केल जाते. रात्री २ पासून खुलेआम रेती काढली जाते. महसूल प्रशासनाची नेमलेले पथक कारवाईसाठी दाखल होताच टिप मिळते. त्यामुळे रेती तस्कर ट्रक घेऊन पसार होतो. 

कोटींची रेती बेपत्ता, कारवाई शून्यबोरगाव धांदे या बैलबाजार परिसरातून तसेच रायपूर, कासारखेडा, विटाळा येथील ई-क्लास परिसरातून दररोज रात्रीला रेती तस्करी केली जाते. गुरुवारी सायंकाळी मंडळ अधिकारी देविदास उगले यांच्या पथकाने या भागात एक कारवाई केली. मंगरूळ दस्तगिर पोलिसांची रात्रीला या भागात गस्त घातली जाते. मात्र, रेतीतस्कर पोलिसांना हुलकावणी देत असल्याचे चित्र आहे. 

रेती तस्करांच्या मुसक्या आवरण्यासाठी भरारी पथक नियुक्त केले आहे. या भरारी पथकाचे आता क्रॉस पद्धतीने रेतीघाटावर नजर राहणार आहे. रेती तस्करांना मदत करणारा एखादा कर्मचारी आढळल्यास त्याच्यावर थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल. - भगवान कांबळे, तहसीलदार, धामणगाव रेल्वे

मागील दीड वर्षांपासून रेतीची चोरी सर्रास सुरू आहे. प्रशासनाकडे तक्रार करूनही या गंभीर बाबी प्रशासन लक्ष देत नाही आणि याची दखल घेत नाही. प्रशासनाच्या सहकार्याने ही रेतीचोरी होत असून, या गंभीर बाबीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. - प्रशांत बायस्कर, ग्रामस्थ, पेठ रघुनाथपूर

 

टॅग्स :sandवाळू