शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
3
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
4
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
5
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
6
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
7
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
8
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
9
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
10
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
11
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेस; पाकिस्तानला लागणार मिरची..!
12
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
13
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
14
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
15
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
16
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
17
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
18
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
19
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
20
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!

एसटी महामंडळाद्वारे प्रवाशांची मुस्कटदाबी

By admin | Updated: July 2, 2015 00:22 IST

एसटी बसचा प्रवास त्रासदायक असला तरी प्रवासीवर्ग याविरोधात आवाज उचलत नसल्याने एसटी महामंडळाचे चांगलेच फावले आहे.

सुविधांचा प्रचंड अभाव : गैरसोयींबद्दल तक्रार करायची तरी कुठे? सुनील देशपांडे अचलपूरएसटी बसचा प्रवास त्रासदायक असला तरी प्रवासीवर्ग याविरोधात आवाज उचलत नसल्याने एसटी महामंडळाचे चांगलेच फावले आहे. या गैरसोयींबद्दल एखाद्या सामान्य प्रवाशाने आवाज उचलला तरी तो पध्दतशिरपणे बंद केला जातो. त्यामुळे प्रवाशांना मरणयातनांबद्दल कुणीही ‘ब्र’ काढायला तयार नाही.भाजप-शिवसेना युतीचे सरकार राज्यात सत्तारुढ होऊन एक वर्ष झाले. सर्वसामान्य माणसाला चांगले दिवस येतील असे आश्वासन देणाऱ्या या सरकारने प्रवाशांना अद्याप अच्छे दिन आणण्याच्या दृष्टीने पावले उचललेली नाहीत. परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते या खात्याचे मंत्री आहेत. यापूर्वी त्यांचा अमरावती जिल्ह्याशी दांडगा संपर्क होता. या जिल्ह्याच्या समस्यांचा त्यांना चांगला अभ्यास आहे. मात्र, त्यांनी अजुनही काही ठोस पाऊल उचललेले दिसत नाही. आश्वासनांशिवाय त्यांचेकडून काहीच मिळत नाही. केवळ नवनवीन घोषणा करुन प्रवाशांना झुलवत ठेवण्याचा उद्योग हे सरकार करीत आहे, असा आरोप प्रवाश्यांकडून होत आहे. आगाराला नवीन गाड्या देण्याचे नुसते आश्वासन दिले जाते. परंतु अद्याप नवीन गाड्या आलेल्या नाहीत. तांत्रिक विभागात रिक्त झालेली पदे भरली जात नसल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम करायला लावून वेळ मारुन नेली जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून होतो आहे. एसटीतील रिक्त जागा भरण्याची मागणी केली जात आहे. फुटक्या खिडक्याफाटलेले टायर आगारातील गाड्यांची अवस्था भंगार आहे. बहुतांश गाड्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत. काही खिडक्यांची दारे जाम झाल्याने त्या सरकत नाहीत. टायर व गाडीतील आॅईलचा दर्जा सुमार आहे. त्यामुळे त्या कधी बंद पडतील याचा नेम नाही. दुसरीकडे या गाड्यांच्या वेगावरही मर्यादा घालून दिल्याने साध्या मिनी ट्रकलाही ओव्हरटेक करताना चालकाला कसरत करावी लागते. आॅटोसारखाच या गाड्यांचा वेग असल्याने एका तासाच्या प्रवासासाठी दीड ते दोन तास लागतात. याकडे लक्ष देण्याची मागणी प्रमोद भोंडे, किशोर मोहोड, गजानन मेहरे, अमोल सुरटकर, संदीप देंडव, प्रितेश अवघड, विवेक महल्ले यांचेसह आदी प्रवाशांनी केली.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या त्यामुळे डिझेलचे दरही कमी झाले. परंतु प्रवाशांना उत्तम सुविधा न देता आधीप्रमाणेच तिकिट दर आकारले जात आहेत. उलट चिल्लर पैशांची वाढ करून बस वाहकाला कमाईची संधी या सरकारने मिळवून दिली असे म्हटल्यास चूक ठरणार नाही.- मनीष अग्रवालसामाजिक कार्यकर्ता.शासनाने ६५ वर्षांवरील नागरिकांना प्रवास भाड्यात ५० टक्के सूट दिली. परंतु ही सूट मिळविण्यासाठी अनेकांनी बनावट कार्ड बनवून घेतले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत एसटीमधून ७० टक्के बोगस वृध्द प्रवासी प्रवास करताना दिसून येतात. कसून चौकशी झाल्यास बोगस वयोवृध्द उघडे पडतील, त्यांना प्रमाणपत्र देणारे रॅकेटही पकडले जाईल. टप्प्याटप्प्याने हे सरकार सुविधा करीत आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते देखील एसटीमध्ये सुधारणा घडवून आणतील यात शंका नाही. - ओमप्रकाश दीक्षितमाजी उपजिल्हाप्रमुख, शिवसेना.