शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टसिटीचा घाण चेहरा !

By admin | Updated: July 27, 2016 00:02 IST

आठ लाख अमरावतीकरांचे आरोग्य निरामय रहावे, यासाठी महापालिका वर्षाकाठी तब्बल १३ कोटी रुपये खर्च करते. तथापि कोट्यवधींचा खर्च होऊनही महानगराचा चेहरा मात्र अस्वच्छच आहे.

४३ कंत्राटदार : स्वच्छतेवर १३ कोटींचा खर्च अमरावती : आठ लाख अमरावतीकरांचे आरोग्य निरामय रहावे, यासाठी महापालिका वर्षाकाठी तब्बल १३ कोटी रुपये खर्च करते. तथापि कोट्यवधींचा खर्च होऊनही महानगराचा चेहरा मात्र अस्वच्छच आहे. अन्य ऋतुंच्या तुलनेत पावसाळ्यात स्वच्छता विभागाच्या कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या फेरीत स्वत:ला ‘प्रोजेक्ट’ करणाऱ्या अमरावती महानगराचा चेहरा घाणीने बरबटलेला आहे. शहरात सर्वदूर साचलेले कचऱ्याचे ढीग, त्यावर ताव मारणारी डुकरे, तुंबलेल्या नाल्या आणि गटारी हे चित्र स्वच्छता आणि आरोग्याचा बोजवारा उडाल्याचे दर्शक आहे. महापालिकेच्या ४३ प्रभागात ४३ कंत्राटदारांच्या ११४६ आणि महापालिकेचा सेवेत असलेल्या सफाई कामगारांकडून शहराची साफसफाई करण्यात येते. मात्र, मुस्लिमबहूल क्षेत्र आणि झोपडपट्टीत कधीही कचरा संकलनाची रिक्षा फिरत नाही. इतवारा बाजारातील भाजीपाला मार्केटमधील लाईनमध्ये मृत वराह आणि स्वच्छतेचा उडालेला बोजवारा यंत्रणेवर दोषारोप करणाराच आहे. महापालिकेच्या अखत्यारितील ४३ प्रभागात कमी-अधिक प्रमाणात स्वच्छतेची बोंबाबोंब आहे. प्रत्येक प्रभागात कंत्राटदारांच्या कामगारांसह महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी कार्यरत असताना सुद्धा घाणीने कळस गाठला आहे. कंत्राटदार आणि स्वच्छता कामगारांवर १३ कोटींहून अधिक रक्कम खर्च होत असली तरी अमरावतीकरांना यातून केवळ आजारच मिळतात. इतवारा बाजार व मुस्लिमबहूल परिसरातील परिस्थिती तर अत्यंत विदारक आहे. या भागातील कचरा महिनोन्महिने उचलला जात नाही. टक्केवारीमुळे अभयअमरावती : सफाई कंत्राटदाराला महापालिका महिन्याकाठी २ लाख ५६ हजार रुपयांचा मोबदला देण्यात येतो. महिन्याकाठी ही रक्कम १ कोटी १० लाखांपर्यंत जाते. त्यामुळे शहर स्वच्छ असणे अपेक्षित आहे. मात्र, कंत्राटदारांची मनमानी व संबंधितांशी आर्थिक लागेबांधे यामुळे अस्वच्छतेवर कुणीही बोलायला तयार नाही. एकंदरीतच स्वच्छतेबाबतचा कंत्राट आणि अन्य बाबींमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने बहुतांश खासगी कंत्राटदारांना टक्केवारीमुळे अभय दिल्याचा आरोप सर्वश्रुत आहे.