शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

‘स्मार्ट सिटी’त का माघारलो? चिंतन करा

By admin | Updated: April 22, 2016 23:59 IST

शहराचा ‘स्मार्ट सिटी’मध्ये समावेश करण्यासाठी मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र, केंद्र सरकारच्या निवड यादीत शहराचे नाव रँकिंगमध्ये ६४ व्या क्रमांकावर असून ‘फास्ट ट्रॅक’ यादीत स्थानच मिळाले नाही.

सुनील देशमुखांचा सल्ला : फास्ट ट्रॅकमध्ये समावेश नाहीअमरावती : शहराचा ‘स्मार्ट सिटी’मध्ये समावेश करण्यासाठी मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र, केंद्र सरकारच्या निवड यादीत शहराचे नाव रँकिंगमध्ये ६४ व्या क्रमांकावर असून ‘फास्ट ट्रॅक’ यादीत स्थानच मिळाले नाही. ही बाब अमरावतीसाठी नुकसानदायक असून ‘स्मार्ट सिटी’त माघारण्याच्या कारणांवर चिंतन करण्याचा सल्ला आ. सुनील देशमुख यांनी दिला. तसेच महापालिका प्रशासनाचा एककल्ली कारभार संबोधून त्यांनी यावर ताशेरे ओढले. ‘स्मार्ट सिटी’त शहर माघारण्याच्या कारणांवरुन ते ‘लोकमत’शी बोलत होते.आ. देशमुख यांच्या मते, जानेवारी २०१६ मध्ये केंद्र सरकारने देशातील ९७ शहरांपैकी पहिल्या टप्प्यात २० शहरांची ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात निवड केली आहे. यात राज्यातील पुणे, सोलापूर शहरांचा समावेश आहे. अमरावतीचे नाव ‘स्मार्ट सिटी’त सहभागी व्हावे, यासाठी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी प्रयत्न केलेत. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. हा उपक्रम राबविताना प्रशासनाने कोणालाही विश्वासात न घेतल्याने ही स्थिती उदभवली आहे. या उपक्रमात शहराचा समावेश न झाल्याने नागरिकांचे नुकसान झाले. ‘स्मार्ट सिटी’ उपक्रम अल्प शहरांसाठी होता. यासाठी प्रस्ताव तयार करताना लोकप्रतिनिधी, तज्ज्ञ, आदींना सोबत घेऊन काम केले असते तर वेगवेगळे अनुभव कामी आले असते. मात्र, आयुक्त गुडेवार यांनी एककल्ली कारभार करून प्रस्ताव सादर केल्यानेच या प्रस्तावाला ४७.५७ गुणांक मिळाले, असा आरोपही देशमुखांनी केला. ‘स्मार्ट सिटी’चा एवढा गाजावाजा केला असतानाही पहिल्या यादीत नाव का आले नाही? अन्य शहरांच्या तुलनेत आपण का माघारलो?, याचे चिंतन झाले पाहिजे. अमरावतीकरांना ‘स्मार्ट सिटी’बाबत नेमके काय झाले, हे कळले पाहिजे. पहिल्या यादीत नाव नसले तरी अगदी काठावर काही गुणांनी माघारलेल्या २३ शहरांचा ‘फास्ट ट्रॅक’ यादीत समावेश करण्यात आला आहे. या ‘फास्ट ट्रॅक’ यादीतसुद्धा अमरावतीचे नाव नसल्याबाबत आ. देशमुखांनी आश्चर्य व्यक्त केले. आ.देशमुखांच्या मते अद्यापही काही बिघडले नाही. मात्र, आयुक्त गुडेवार यांनी सर्वसमावेशक विचार करून ‘स्मार्ट सिटी’करिता नव्याने प्रस्ताव तयार करताना एकट्याने रथ ओढण्याऐवजी सर्वांना सोबत घेतले पाहिजे. म्हणजे किमान दुसऱ्या टप्प्यात तरी अमरावतीचे नाव यायला हवे. याकरिता काही बाबी लपवून न ठेवल्या तर बरे होईल, असा सूचक सल्ला त्यांनी दिला. केंद्र सरकारने नेमलेल्या एजन्सीमार्फतच डीपीआर तयार करणे अपेक्षित आहे. मात्र, आयुक्तांनी नियम गुंडाळून एजन्सी नेमण्याचा प्रताप केल्याचेही ते म्हणाले. विकासकामे करायचे असतील तर सर्वांना सोबत घ्यावे लागेल. अन्यथा अपयश पदरी पडते. नेमके हेच ‘स्मार्ट सिटी’बाबत झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात शहराचे नाव आणण्याची आणखी एक संधी आहे अन्यथा ‘स्मार्ट सिटी’पासून अमरावतीकरांना वंचित रहावे लागेल, असेही आ.देशमुख म्हणाले. आयुक्तांनी ‘स्मार्ट सिटी’त जे काही केले ते आपल्या मर्जीनुसार केले आहे. (प्रतिनिधी)‘ताली कप्तान को, तो गाली भी कप्तान को’- सुनील देशमुखअमरावती शहराचे नाव ‘स्मार्ट सिटी’च्या पहिल्या यादीत झळकणार, असा मोठा गाजावाजा करण्यात आला. ‘स्मार्ट सिटी’साठी मी अमूक केले, तमूक केले, अशी बतावणी करून महापालिका आयुक्तांनी शहरवासीयांची दिशाभूल केली. त्यामुळे यादीत नाव का आले नाही, काय चुकले? हे जनतेला कळले पाहिजे. ‘ताली कप्तान को, तो गाली भी कप्तान को’ या म्हणीनुसार आयुक्तांनी अपयशदेखील स्वीकारले पाहिजे, असा प्रहारही आ. सुनील देशमुख यांनी केला.२० शहरांची 'स्मार्ट सिटी'त निवडकेंद्र सरकारने ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात पहिल्या टप्प्यात देशातील २० शहरांची निवड केली आहे. यात भुवनेश्वर, पुणे, जयपूर, सुरत, कोची, अहमदाबाद, जबलपूर, विशाखापट्टणम्, सोलापूर, देवनगरी, इंदूर, कोर्इंबतूर, काकिनाडा, बेलगावी, उदयपूर, गुवाहाटी, चेन्नई, लुधियाना, भोपाळ, दिल्ली या शहरांचा समावेश आहे.‘फास्ट ट्रॅक’मध्ये समाविष्ट शहरे४वारंगल, चंदीगड, लखनऊ, न्यू कोलकाता, पणजी, पासीघाट, धर्मशाळा, फरिदाबाद, रायपूर, दीव, भावनगर, शिलाँग, नामची, पोर्ट ब्लेअर, ओलग्रेट, सिल्व्हासा, इंफाल, रांची, अगरतला, कोहिमा, ऐझवल, कर्वटी, देहरादूनचा समावेश आहे.