शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’ प्रवेश हुकला

By admin | Updated: June 24, 2017 00:01 IST

बहुप्रतिक्षित स्मार्ट सिटीची चौथी व शेवटची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली.

अंतिम यादी जाहीर : अपयशाची हॅटट्रिक, सल्लागारच कारणीभूत लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बहुप्रतिक्षित स्मार्ट सिटीची चौथी व शेवटची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. यात पुन्हा एकदा महापालिका अपयशी ठरली असून ८ लाख अमरावतीकरांचे स्वप्न धूळीस मिळाले आहे. केंद्राद्वारे जाहीर अंतिम यादीत अमरावती शहराचा समावेश होऊ न शकल्याने महापालिका प्रस्तावाच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. महापालिकेने अपयशाची हॅटट्रिक पूर्ण केली आहे.देशातील १०० स्मार्ट शहरे वसविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून स्मार्ट सिटी योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत केंद्र सरकार आता ३० शहरांचा विकास करणार आहे. या ३० शहरांच्या नावाची घोषणा केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी केली. स्मार्ट सिटीची ही अखेरची यादी असून यात महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड या एकमेव शहराचा समावेश आहे. जानेवारी २०१६ पासून आतापर्यंत सरकारने ९० स्मार्ट सिटींची नावे जाहीर केली आहेत. पहिल्या यादीत २०, दुसऱ्या यादीत १३, तिसऱ्या यादीत २७ आणि शुक्रवारी जाहीर झालेल्या अंतिम यादीत ३० शहरांचा समावेश आहे. यात समाविष्ट अमरावती शहर आंध्रप्रदेशातील आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार प्रत्येक शहराला ५ वर्षात ५०० कोटी देणार आहे. जागतिक दर्जाची वाहतूक व्यवस्था, २४ तास वीज आणि पाणी, एक खिडकी योजना, शहरात एका भागातून दुसऱ्या भागात केवळ ४५ मिनिटात जाण्याची सुविधा, स्मार्ट एज्युकेशन आणि उत्तम सुरक्षा व्यवस्थेचा स्मार्ट सिटीत समावेश आहे. मात्र, अंतिम यादीत अमरावतीचा समावेश न झाल्याने नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे.१८०५ कोटींचा होता प्रकल्प अमरावती मनपाने स्मार्ट सिटीसाठी १८०५ कोटींचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविला होता. यात पॅनसिटी, रेट्रोफिटिंग, एरियाबेस्ड डेव्हलपमेंट आणि ग्रीनफिल्डचा समावेश होता. याआधी २२६८ कोटींचा तर गुडेवारांच्या काळात ५५०० कोटींचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र, स्पर्धेत तीनही प्रस्ताव तग धरु शकले नाहीत.एकवाक्यतेचा अभाव पहिल्या दोन प्रयत्नात अपयश पदरी पडल्यानंतर किमान तिसऱ्या प्रयत्नात शहराचा स्मार्ट सिटीच्या यादीत समावेश व्हावा,यासाठी मनपा प्रशासनाने कंबर कसली होती. स्मार्ट सिटीच्या यादीत शहराचे नाव झळकत नाही तोपर्यंत संबंधित एजंसीला आर्थिक मोबदला न देण्याची भूमिका घेण्यात आली होती.मात्र, कन्सलटन्सीमध्ये एकवाक्यतेचा अभाव असल्याने व या एजन्सीजने पुरेसे होमवर्क न केल्याने महापालिकेला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले आहे.स्मार्ट सिटीचा डीपीआर हाताळणाऱ्यांपैकी एका व्यक्तीचा अतिशहाणेपण महापालिकेला नडल्याची बाब आता अधोरेखित झाले आहे.