शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

४२८ कोटींच्या कर्जातून १४६९३ बचत गटांनी उभारले लघुउद्योग

By जितेंद्र दखने | Updated: June 26, 2024 20:33 IST

डीआरडीए, महिला आर्थिक सक्षम बनविण्याचा प्रयन्न

अमरावती : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या जिल्हा अभियान व्यवस्थापन विभागाच्या वतीने महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी त्यांच्या लघुउद्योगांना प्राधान्य देत जिल्ह्यात १४ हजार ६९३ महिला बचत गटांना ४२८ कोटी ८३ लाख ८३ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. या कर्जातून त्यांनी लघुउद्योगांची स्थापना केली. १५ बँकांनी या बचत गटांना कर्जाचा पुरवठा केला आहे.

एका महिलेला आर्थिक सक्षम केले तर एक परिवार सक्षम होतो. या धारणेतून शासनाच्या वतीने कर्जाची शिफारस केली जाते. त्यानंतर बँकांच्या वतीने या बचत गटांना कर्जाचे वितरण केले जाते. अशातच जिल्ह्यात १२ राष्ट्रीयीकृत, २ खासगी व १ ग्रामीण बँकेमार्फत १४ हजार ६९३ महिला बचत गटांना ४२८ कोटी ८३ लाख ८३ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे. या कर्जातून महिलांनी लघुउद्योग सक्षम केले आहे. परिणामी जिल्ह्यात २१ हजार ४०० महिला बचत गटाचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. या बचत गटांचे घरगुती साहित्यांसह विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल तालुका व जिल्हास्तरावर झळकत आहेत. दरवर्षी जिल्हा व विभाग स्तरावर बचत गटांचे स्टॉल लावले जातात. विशेष म्हणजे त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी देखील या विभागामार्फत प्रयत्न केले जात असल्याची माहिती जिल्हा समन्वयक नीलेश मेश्राम यांनी दिली आहे.महिलांना आर्थिक सक्षम बनवणे हा हेतूमहिलांना आर्थिक सक्षम करून त्यांना महिला उद्योजक बनवण्याचा मानस आहे. बचत गटांना कर्जच देत नाही तर त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देत आहोत. मेळघाटातील वस्तूंना महिला बचत गटांची स्थापना करून या माध्यमातून त्यांना आर्थिक सक्षम करण्याची योजना सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत चालणाऱ्या जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाकडून महिला बचत गटांना लघुउद्योगांकरिता ब्रँड बनवत मेळघाट हाट तयार केला आहे. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांनी दिली.