शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टी दादा एक वर्षासाठी तुरुंगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 22:23 IST

कुख्यात गुन्हेगार अशोक उत्तम सरदार (३४, रा.जेवडनगर) याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. त्याला एक वर्षासाठी तुरुगांत स्थानबद्ध केले आहे.

ठळक मुद्देझोपडपट्टी दादा एक वर्षासाठी तुरुंगात

xलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कुख्यात गुन्हेगार अशोक उत्तम सरदार (३४, रा.जेवडनगर) याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. त्याला एक वर्षासाठी तुरुगांत स्थानबद्ध केले आहे.राजापेठ हद्दीत दादागिरी करणारा अशोक सरदार हा सन २००५ पासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. शस्त्रासह प्राणघातक हल्ले, गैरकायद्याची मंडळी जमवून हल्ले करणे, हत्या, गंभीर दुखापत करणे, अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी देणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, घरफोडी, जबरी चोरी, जुगार, अवैध दारूची विक्री अशाप्रकारचे अशोक सरदारविरुद्ध १७ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. राजापेठसह फ्रेजरपुरा व बडनेरा हद्दीतील हे गुन्हे आहेत. अशोक सरदारविरुद्ध अनेकदा प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यालाही जुमानत नसल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. यापूर्वी त्याला तडीपार करण्यात आले होते. मात्र त्यात कोणताही बदल झाला नाही. त्याच्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिक दहशतीत आले होते. त्याच्यासंदर्भात अनेक नागरिकांच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने राजापेठचे ठाणेदार किशोर सूर्यवंशी यांनी पोलीस शिपाई पे्रम रावत यांच्या मदतीने अशोर सरदारविरुद्ध एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव तयार केला. त्या प्रस्तावाची आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी व विधी अधिकारी विश्वास वैद्य यांच्यामार्फत पूर्तता करण्यात आली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अशोक सरदारविरुद्ध एमपीडीएची कारवाईची शिफारस पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्याकडे केली. त्यानुसार पोलीस आयुक्तांनी शनिवारी १६ मार्च रोजी अशोक सरदारच्या स्थानबद्धचे आदेश पारीत केले. त्यानुसार पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी अशोक सरदारची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. अशोक सरदारला आता वर्षभर जेलमध्ये राहावे लागणार आहे.दहशतीतून सुटकाझोपडपट्टी दादा अशोक सरदार तुरुगांत गेल्याने राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. मद्यप्राशन करून नागरिकांना नाहक त्रास देणे, मारहाण करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारा अशोक सरदारने तुरुगांत गेल्याने नागरिकांनी या दहशतीतून सुटका झाल्याचे समाधान व्यक्त केले