शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

खरवाडीची पुनरावृत्ती टळली

By admin | Updated: July 28, 2016 00:02 IST

चांदूरबाजार नजीकच्या खरवाडीत जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकने १२ वाहनांना धडक देत कारला चिरडल्याने तिघे ठार झाले होते.

मद्यधुंद ट्रक चालकाला अटक : बियाणी चौक ते विद्यापीठ रोडवरील घटना अमरावती : चांदूरबाजार नजीकच्या खरवाडीत जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकने १२ वाहनांना धडक देत कारला चिरडल्याने तिघे ठार झाले होते. या घटनेची पुनरावृत्ती मंगळवारी बियाणी चौक ते वेलकम पॉर्इंट मार्गावर घडणार होती. मात्र, वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने हा प्रकार टळला. या परिसरात एक भरधाव ट्रक दिसून येताच वाहतूक पोलिसांनी पाठलाग करून ट्रकला अडविल्याने मोठा अपघात टळला. ट्रकचालक बेजबाबदारपणे ट्रक पिटाळत होता. शहर पोलिसांनी जड वाहतुकीला प्रवेशबंदी केली आहे. तरीसुद्धा शहराच्या काही भागात जडवाहने प्रवेश करताना दिसून येतात. मंगळवारी विद्यापीठ ते बियाणी चौक मार्गावर स्टंट राईडिंग व एमव्ही अ‍ॅक्टची मोहीम राबविण्यात आली. सायंकाळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अजय मालविय यांच्या नेतृत्वात वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक बेले, पोलीस शिपाई सचिन श्रीवास, दिलीप रत्नपारखी, चालक अजय कवटकर वाहन तपासणी करीत होते. दरम्यान ट्रक क्रमांक एम.एच. एक्स. ३०७५ सुसाट वेगाने विद्यापीठाकडून बियाणी चौकाकडे जात होता. ही बाब लक्षात येताच मालवीयसह अन्य पोलिसांनी तत्काळ ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो भरधाव ट्रक वेलकम पॉर्इंटच्या दिशेने निघून गेला. त्यामुळे पोलिसांनी जीपद्वारे ट्रकचा पाठलाग सुरू केला. अखेर वेलकम पॉर्इंटजवळ ट्रकला थांबविण्यात पोलिसांना यश मिळाले. चालकाने मद्यप्राशन केले होते. ट्रक चालकाने त्याचे नाव किसना रामराव तायडे सांगितले. गाडगेनगर पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम २७९, १८४, १८५ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास एएसआय विजय गरूड करीत आहेत. (प्रतिनिधी) ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना दिल्या सूचना भरधाव ट्रक बियाणी चौकातून वेलकम पॉर्इंटच्या दिशेने जात असताना पोलीस ट्रकचा पाठलाग करीत होते. या मार्गावर वर्दळ सुरु असल्यामुळे पोलिसांनी ध्वनीक्षेपकाद्वारे वाहनाधारकांना सूचना देणे सुरु ठेवले होते. त्यामुळे वाहनधारक सुरक्षित अंतरावरून वाहने चालवित होते. भरधाव ट्रक बियाणी चौकातून वेलकम पॉर्इंटकडे धोकादायक स्थितीत जात होता. त्याचा पाठलाग करताना मार्गावरील वाहनधारकांना लाऊडस्पिकर्सद्वारे बाजूला सरकण्यास सांगण्यात आले. त्या ट्रकला अखेर वेलकम पॉर्इंटजवळ अडविले. - अजय मालविय, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.