शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

आपल्याच घरात हाल सोसतेय मायबोली

By admin | Updated: February 27, 2017 00:14 IST

रूप लावण्याने मोहरूण ऐेटीत झडपली मराठी, सीमोलंघन करीत अटकेपार झडपली मराठी।

आज मराठी राजभाषा दिन : मराठीच्या अस्तित्वासाठी लढाई; न्याय व्यवस्थेत ५० टक्के मराठीचा वापरमोहन राऊत अमरावतीरूप लावण्याने मोहरूण ऐेटीत झडपली मराठी,सीमोलंघन करीत अटकेपार झडपली मराठी।देहू पंढरीच्या स्पर्शाने गोदातीरी धडकली मराठी,चकाकणाऱ्या इंग्रजीच्या कुंपणात अडकली मराठी।।मागील एक हजार वर्षांची परंपरा लाभलेल्या मराठी मायबोली आपल्या घरातच हाल सोसतेय आहे़ आज शुध्द मराठी वाक्य कानावर पडत नाही, तर बालवाडीपासून ते केजी नर्सरीपर्यंत या मायबोलीच्या भाषेत इंग्रजी हिंदी शब्दांचा वापर होत असल्यामुळे अस्तित्वाची लढाई या मराठी भाषेला लढावी लागत आहे़सोमवारी मराठी राज भाषा दिन आहे़ प्रत्येकाने अस्सल मराठी भाषेत बोलावे, पाल्यांना मराठी शाळेत प्रवेश द्यावा, ग्रामस्तरापासून तर मंत्रालयातील न्याय व्यवस्थेतही मराठी भाषेचा वापर करून आदेश याच भाषेत काढावे असे आदेश अनेक वर्षांपासून राज्य शासन देत असताना केवळ हे आदेश कागदोपत्री ठरले असल्याची वस्तुस्थिती आहे़ केवळ मराठी भाषा साहित्य संमेलन व काव्य मैलफीच्या मंचावर मराठी भाषेचा वापर होतो. शासन तळमळीने मराठी भाषेसाठी धोरण राबविताना दिसत नाही. आज या मराठीत हिंदी, इंग्रजी भाषेतील शब्दाचा शिरकाव झाला आहे़ दहा शब्दांच्या एका मराठी वाक्यात किमान सहा शब्द इंग्रजी असतात ही सध्या मराठीची अवस्था आहे़ आजच्या शाळेत जाणाऱ्या पिढी पासून ते पदवी हातात घेऊन शासकीय खात्यात नोकरी करणाऱ्या २५ ते ३५ या वयोगटातील तरूण मराठी बोलताना इंग्रजी भाषा मिसळत असताना ऐकायला मिळते. शाळेकरी मुलांची बोटेही माऊस व की बोर्डवर सराईत पणे फिरत आहे़ या इंटरनेटच्या जाळ्यात आगामी अर्ध्या शतकात मराठी कितपत टिकेल या विषयी चिंता अस्सल मराठी भाषा बोलणाऱ्यांनी व्यक्त केली आहे़ ९ कोटी लोकांची मातृभाषा असलेल्या मराठी भाषेला १ हजार वर्षांचा इतिहास आहे़ आज सर्वाधिक दर्जाचे व प्रगतीचे शिक्षण मराठी शाळेत मिळत असलेतरी या ग्रामीण भागातील मराठी शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत आहे़ या मराठी शाळेत जाणाऱ्या मुलाकडे पाहण्याची दृष्टी बदलत चालली आहे़नोकरीसाठी केवळ मराठीचा वापरआज संशोधनाच्या पातळीवर मराठी संतरचना, नाटक, कथा, कादंबऱ्या, अशा साहित्यिक अंगाने प्रबंध सादर करणाऱ्यांचा कल दिसत आहे़ पदव्युत्तर पदवी व पीएचडी चे नामाविधान मिळाल्यानंतर नोकरी मिळण्यासाठी मराठी विषयात पीएचडी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे़ परंतु अनेक प्राध्यापकांकडून अभ्यासक्रमाशी निगडित वाचन करण्यापलीकडे मराठी भाषेचा भाषिक संर्वधनाच्या पातळीवर अभ्यास होत नाही, ही स्थिती आहे़ न्याय व्यवस्थेत ५० टक्के भाषासर्वसामान्य माणसांना कायद्याविषयी अधिक ज्ञान व्हावे, कायद्यापासून अज्ञानी राहू नये, म्हणून न्याय व्यवहारात प्रांतिक भाषेचा वापर करण्याचे आदेश राज्य शासनाने यापूर्वीच दिलेत. परंतु राज्याच्या जिल्हा न्यायालयात या भाषेचा वापर केवळ ५० टक्के होत असल्याचे पहायला मिळत आहे़ ही भाषा टिकवीण्यासाठी आता राज्य शासनाने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे़मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी साहित्य अकादमीने त्वरित निर्णय घ्यावा. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि़वा़शिरवाळकर यांचा जन्मदिवस आहे़ या दिवशी साहित्य अकादमीने निर्णय घ्यावा, ही अपेक्षा़- विनायक त्रिपत्तीवार,उपाध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ