शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

इच्छुकांची झोप उडाली; अपक्षांचा भ्रमनिरास

By admin | Updated: May 31, 2016 00:05 IST

एका प्रभागातून चार नगरसेवक निवडण्याच्या पद्धतीमुळे राज्य आणि देशपातळीवरील राजकीय पक्षांना फायदा मिळू शकतो,....

महापालिकेत चार सदस्यीय प्रभाग : विरोधाचा सूर होतोय तीव्रअमरावती : एका प्रभागातून चार नगरसेवक निवडण्याच्या पद्धतीमुळे राज्य आणि देशपातळीवरील राजकीय पक्षांना फायदा मिळू शकतो, तर अपक्ष किंवा लहान पक्षांच्या उमेदवारांना फटका बसू शकतो, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. यामुळे अपेक्ष आणि इच्छुकांची झोप उडाली आहे. महापालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुका प्रभाग पद्धतीनेच होणार आहेत. एका प्रभागातून चार सदस्य निवडीचा अध्यादेश दोन दिवसांपूर्वीच काढण्यात आला. या अध्यादेशाने कॅबिनेटच्या बैठकीत झालेल्या चार सदस्यीय प्रभाग पद्धतीवर शिक्कामोर्तब झाले. निवडणुकीसाठी एका प्रभागातून दोन महिला, दोन पुरुष, असे सूत्र आखले जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने एका प्रभागात दोन महिला उमेदवार राहणार आहेत. त्यामुळे अपक्षांसह लहान-मोठ्या पक्षांच्या उमेदवारांना विजयासाठी ताकद पणाला लावावी लागेल. चार सदस्यीय पद्धतीचा सर्वाधिक फायदा काँग्रेस आणि भाजपसारख्या बड्या पक्षांना मिळण्याची शक्यता आहे. ८७ सदस्यीय अमरावती महापालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक २५ सदस्य आहेत. काँग्रेस-राकाँ फ्रंटची सत्ता असली तरी त्यांना अपक्षांचे पाठबळ मिळाले आहे. रिपाइं आठवले गट, गवई गट, बसपा, मुस्लिम लिग यांसारख्या छोट्या पक्षांना विजयासाठी महत्तम प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे बड्या राजकीय पक्षांव्यतिरिक्त लहान पक्ष आणि अपक्षांनी या पद्धतीलाच विरोध दर्शविला आहे. (प्रतिनिधी)बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमहानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथवर चार पालिका सदस्य परंतु तीनपेक्षा कमी नाहीत व पाचपेक्षा अधिक नकोत, इतके पालिका सदस्य निवडून दिले जातील. नगरपरिषदेच्या प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथवर दोन परिषद सदस्य परंतु तीनपेक्षा अधिक होणार नाहीत, इतके परिषद सदस्य निवडून देण्यात येणार आहेत. सुधारणेचा अध्यादेशमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठीचा अध्यादेश, असे या अध्यादेशाला संबोधण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या अध्यक्षाची थेट निवडणूकनगरपरिषदेचा अध्यक्ष परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये परिषदेच्या मतदारांद्वारे निवडण्यात येईल. तथापि नगरपंचायतीच्या अध्यक्षांच्या संबंधातील प्रचलित पद्धत पुढे चालू राहील. परिणामी जेथे अध्यक्ष परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये परिषदेच्या मतदारांद्वारे निवडला आहे, तेथे उपाध्यक्षाच्या निवडणुकीच्या संबंधातील तरतुदींमध्ये फेरबदल प्रस्तावित आहेत. अपेक्षा फोल ठरलीसन २००७ मध्ये निवडणुकीत वॉर्ड पद्धतीचा वापर झाला. सन २०१२ मध्ये पुन्हा प्रभाग पद्धती वापरली गेली. परिणामी २०१७ मध्ये वॉर्ड पद्धतीचा वापर होईल, अशी विद्यमान नगरसेवकांची अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा फोल ठरली.