शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

कडुनिंबाच्या झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:48 IST

कोठारा-खरपी दरम्यान बैतुल मार्गावर नागरिकांच्या डोळ्यांदेखत कडुनिंबाच्या हिरव्या झाडांची कत्तल होत आहे.

ठळक मुद्देवाहतुकीला अडसर : परतवाडा वनक्षेत्रपालांचे अक्षम्य दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : कोठारा-खरपी दरम्यान बैतुल मार्गावर नागरिकांच्या डोळ्यांदेखत कडुनिंबाच्या हिरव्या झाडांची कत्तल होत आहे.शनिवार दुपारी दीड वाजतापासून कडुनिंबाची कत्तल सुरू आहे. एकाच झाडावर सहा ते सात लोक कुºहाडी व आऱ्या चालवित होते. प्रवाशांना त्रास होणार नाही, याचीही दक्षताही येथे घेतली जात नव्हती. त्यामुळे एक ते दोन तास रस्त्यावरील वाहतूक बाधित झाली. निर्दयीपणे तोडलेल्या या उच्चप्रतीच्या कडुनिंबाच्या लाकडांची वाहतूकही सर्वांदेखत करण्यात आली. कोठारा-खरपी दरम्यान ही वृक्षतोड होत असताना, परतवाडा वनविभागातील वनक्षेत्रपाल आणि त्यांच्या अधिनस्थ वनरक्षकांना साधी दखलही घ्यावीशी वाटली नाही.वृक्षतोडीची वनविभागानेच परवानगी दिली आहे. परवानगी देताना वृक्षाची स्थितीदर्शक पंचनामा चुकीचा केल्याचे दिसून येते. झाड निकोप, सरळ, भरीव व उच्च प्रतीचे असतानाही अनेक झाडांना त्यांनी पोकळ दाखवले आहे. हिरव्या झाडाला वाळलेले आणि निकृष्ट दाखविण्याचा प्रतापही वनविभागाने केला आहे.पंचनामा व टीपीवृक्षतोडीच्या अनुषंगाने वनपालांना विचारले असता, वृक्षतोडीनंतर पंचनामा होईल, मग टीपी दिला जाईल, मगच वाहतूक करता येईल, असे सांगितले. वस्तुस्थिती अशी की, कडुनिंबाच्या झाडाच्या लाकडाची वाहतूक करताना वननियमानुसार टीपी आवश्यक आहे.वरिष्ठांचा आदेश?परतवाडा येथील वनपालांशी याबाबत घटनास्थळाहून भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी ‘वरच्या आदेशा’चा हवाला दिला. वनरक्षक गस्तीवर असल्याचेही ते म्हणाले. प्रत्यक्षात त्यांच्या अधिनस्थ हत्तीघाट, पूर्व हत्तीघाट, पश्चिम हत्तीघाट, बहिरम, शिरजगाव, पांढरी, गोंडविहीर, काळवीट परिसरात १ डिसेंबरला एकही वनरक्षक कार्यरत असल्याचे दिसून आले नाही. वनचौकीदारही जंगलात बघायला मिळाले नाहीत.