शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

बोंडअळी बाधित कापसामुळेच त्वचाविकाराची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 01:16 IST

सध्या कापसाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांची घरात साठवणूक केली, मात्र बोंडअळीने बाधित असल्यामुळे कापसाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात त्वचाविकाराची लागण होत आहे.

ठळक मुद्देवेचणीला मजूर मिळेनात : संपर्र्कात येणाऱ्यांना व्याधी, कंपन्यांनी द्यावी भरपाई, शेतकरी मिशनची मागणी

ऑनलाईन लोकमतअमरावती : सध्या कापसाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांची घरात साठवणूक केली, मात्र बोंडअळीने बाधित असल्यामुळे कापसाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात त्वचाविकाराची लागण होत आहे. बीटी कपाशीनेच हे नवे संकंट शेतकऱ्यांवर ओढावलेल आहे. यासाठी अशा रुग्णांना मोफत उपचार करून बियाणे कंपण्यांकडून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी मिशनद्वारा करण्यात आली.विदर्भ व मराठवाड्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतरचे वास्तव भयावह असल्याचे त्यांनी ‘लोकमत‘शी बोलताना सांगितले. याविषयी राज्य सरकारला दिलेल्या अहवालात सत्य अधोरेखित केले आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या कापसातील जंतू मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्यानेच गावखेड्यात सर्वत्र अ‍ॅॅलर्जी व प्रचंड खाजेच्या आजाराने शेकडोच्या संख्येनी शेतकरी प्रभावित झाले आहेत. उपचाराच्या नावावर अनेकांची प्रचंड लूट होत असल्याच्या तक्रारी मिशनकडे आल्याचे त्यांनी सांगितले.शेतकºयांचे गुलाबी अळींच्या संकटाचा सामना करण्यासाठी कृषी, ग्रामविकास व महसूल विभागाचा सहभागााह शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. बोंडअळीग्रस्त पीक समूळ नष्ट करणे, जमिनीमधील गुलाबी अळीच्या अंडी नष्ट करणे, कपाशीची फरदळ न घेता काढून टाकणे, मॉन्सूनपूर्व कापसाची पेरणी टाळणे, पुढच्या वर्षी डाळीचे वा तेलबियांचे पीक घेणे, विदेशी कापसाचे बियाणे गुलाबी अळीचे निमंत्रक असल्यामुळे या कापसाच्या बियाणांच्या जागी देशी सरळ वाणाच्या कापसाचा पेरा करणे एकमेव उपाय कापूस उत्पादक शेतकºयांसमोर असल्यामुळे सरकारने कृषी खाते, केंद्रीय कापूस शोध संस्था, भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी विद्यापीठ यांना कामावर लावणे गरजेचे असल्याचा सल्ला मिशनद्वारा राज्य शासनाला दिला.साठवणूक केलेल्या कापसामुळेच खाज, अ‍ॅलर्जीसोनबर्डी येथे घरात साठविलेल्या कापसामुळे खाज व त्वचारोगाची लागण होत असल्यामुळे शेतकºयांनी कापूस अंगणात ठेवला आहे. यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव व झरी तालुक्यात बी.टी. कापसामुळे प्रचंड प्रमाणात त्वचाविकाराची लागण झाल्याच्या शेकडो तक्रारी आल्यानंतर कै. वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील डीन मनीष शिरिगिरवार यांनी तेथे विषेश चमू पाठविली. यवतमाळचे जिल्हाधिकाºयांनी अ‍ॅलर्जी व त्वचाविकाराची सर्वच औषधी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून दिली आहे. अमरावती जिल्ह्यात मंगरूळ दस्तगीरला त्वचाविकार होत असल्याच्या तक्रारी आहेत.बीटी कपाशीपासून कुठल्याही प्रकारचा त्वचारोग होत नाही, हे मागील १५ वर्षांच्या परीक्षणामधून स्पष्ट झाले आहे. मात्र, कापसातील काही किडीमुळे अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता आहे.- सी. डी. मायी, माजी अध्यक्ष,एएसआरबी, दिल्ली