विदर्भातील पहिलाच प्रयोग : अडचणींवर प्रात्यक्षिकांतून मार्गदर्शन इंदल चव्हाण - अमरावतीजिल्हा स्त्री रुग्णालयात प्रथमच स्किल लॅबची संकल्पना साकारण्यात आली. याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य संचालक सतीश पवार यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रात केवळ पुणे आणि अमरावती येथे स्किल लॅब असून. डॉक्टरांना कौशल्यवाढीसाठी याचा फायदा होणार असून रुग्णांनादेखीलदिलासा मिळणार आहे.डफरीनमध्ये प्रसूतीदरम्यान अडचण भासू नये, डॉक्टरांचे प्रयत्न अपुरे पडू नयेत यासाठी स्किल लॅबची संकल्पना सहसंचालक अतिरिक्त आरोग्य संचालक अर्चना पाटील, राजीव जोथकर, संजीव कांबळे (पुणे), अकोला परिमंडळाचे उपसंचालक अविनाश लव्हाळे, नागपूरचे युनिसेफ समन्वयक आमले, पुण्याचे कर्नाटकी, सीएस अरुण राऊत, आरोग्य अधिकारी नितीन भालेराव व निकम यांंनी तयार केली. उपरोक्त तज्ज्ञांच्या सहकार्याने अरुण यादव यांनी ती साकारली आहे.
'डफरीन'मध्ये आकार घेतेय ‘स्किल लॅब’ !
By admin | Updated: December 25, 2014 23:24 IST