शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमात स्कीलवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 22:56 IST

तंत्रशिक्षण अभ्यासक्रम अद्ययावत करण्यावर देशभरात प्रयत्न सुरू असून, विशेषत्वाने त्यात कौशल्य वाढविणाऱ्या अभ्यासक्रमांच्या समावेशावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन माजी कुलगुरू विलास सपकाळ यांनी केले.

ठळक मुद्देविलास सपकाळ : विद्यापीठात कौशल्य विकासावर राष्ट्रीय कार्यशाळा

आॅनलाईन लोकमतअमरावती : तंत्रशिक्षण अभ्यासक्रम अद्ययावत करण्यावर देशभरात प्रयत्न सुरू असून, विशेषत्वाने त्यात कौशल्य वाढविणाऱ्या अभ्यासक्रमांच्या समावेशावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन माजी कुलगुरू विलास सपकाळ यांनी केले.विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने द्विदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी विलास सपकाळ यांनी अध्यक्षीय विवेचन केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून स्वामी जनागम्यानंद, व्ही. मोहनकुमार, प्राचार्य डी.जी. वाकडे, संयोजक तथा एल.एल.एल.चे संचालक श्रीकांत पाटील उपस्थित होते.विलास सपकाळ पुढे म्हणाले, संसाधनाचा जास्तीत जास्त उपयोग होण्यासाठी प्रत्येकामध्ये कौशल्याची गरज आहे. कौशल्यामुळे जीवनात यशस्वी होण्यास मदत होते. माणसाला एक विशिष्ट ओळख प्राप्त होते. परिषदेच्या माध्यमातून त्याचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असा विभास त्यांनी व्यक्त केला.व्ही. मोहनकुमार यांनी उपस्थितांना ‘आम्ही सर्व जण आमच्या जीवनात आजीवन अध्ययन, मूल्यशिक्षण आणि कौशल्य विकासावर भर देऊ. त्यामुळे सर्वांचे जीवन उंचावण्यास मदत होईल’ अशी प्रतिज्ञा दिली. यावेळी स्वामी जनागम्यानंद यांनी भाष्य केले.कार्यशाळेचे संचालन ज्ञानेश्वर घडकर यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य एस.व्ही. आगरकर यांनी केले. शिक्षण विभागाचे प्रमुख जी. एल. गुल्हाने, संगणक विभागाचे सुशील काळमेघ, संगीता बिहाडे यांनी परिषदेत शोधनिबंध सादर केल्याबद्दल त्यांचा पारितोषिक देवून सन्मान करण्यात आला. यावेळी वºहाडपांडे व गोरखनाथ कांबळे यांनी मनोगतातून भावना व्यक्त केल्यात.द्विदिवसीय परिषदेला देशभरातील अनेक संशोधक, विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.