शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात सहा वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 01:36 IST

एका सहा वर्षीय चिमुकलीवर ३० वर्षीय नराधमाने अतिप्रसंग केल्याची घृणास्पद घटना तालुक्यातील एका गावात गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने समाजमन सुन्न झाले. ग्रामस्थांनी त्या नराधमाची बेदम चोप देऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

ठळक मुद्देनराधमाला चोप : पोलिसांकडून गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : एका सहा वर्षीय चिमुकलीवर ३० वर्षीय नराधमाने अतिप्रसंग केल्याची घृणास्पद घटना तालुक्यातील एका गावात गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने समाजमन सुन्न झाले. ग्रामस्थांनी त्या नराधमाची बेदम चोप देऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. मन्साराम परसराम भिलावेकर (३०, रा. राणीगाव) असे आरोपीचे नाव आहे.मेळघाटातील एक सहा वर्षीय चिमुकली गुरूवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घरासमोरील अंगणात मैत्रिणींसोबत खेळत होती. आरोपी मन्साराम भिलावेकर त्या चिमुकली जवळ गेला. तिला खाऊ देण्याचे प्रलोभन देत त्याच्या राहत्या घरी नेले. तेथे त्या चिमुरडीवर शारीरिक अत्याचार केला. तिचे आई-डील सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घरी पोहचल्यावर तिने आपबिती कथन केली.पीडिताच्या पालकांनी गावातील पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधला व त्यांना घेऊन आरोपीला जाब विचारला. तेव्हा आरोपी मन्सारामने त्यांना शिवीगाळ करीत तेथून पळून गेला. मात्र, ग्रामस्थांनी त्याला पकडले. त्याला बांधून ठेवून बेदम चोप दिला. रात्री ९ वाजेपर्यंत त्याला बांधून ठेवले. पोलिसांशी संपर्क साधून घटनेचे गांभीर्य पटवून देण्यात आले. यावरून ठाणेदार विलास कुलकर्णी, उपनिरीक्षक रविकिरण खंडारे, प्रवीण बोंडे, साबुलाल दहीकर यांनी ५० किलोमीटर अंतरावरील राणीगाव गाठून आरोपी मन्साराम भिलावेकर याला अटक केली. पीडिताच्या आईच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंविचे कलम कलम ३७६, सहकलम पोक्सो ४ अन्वये गुन्हा नोंदविला. पोलीस कोठडी मिळविण्याकरिता आरोपीस अचलपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

टॅग्स :Rapeबलात्कार