शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

चैत्यभूमीसाठी रेल्वेच्या सहा विशेष गाड्या

By admin | Updated: November 29, 2015 00:57 IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमीवर ...

६ ते ८ डिसेंबर दरम्यान धावणार : मुंबई, दादर येथून सुरु करण्याचा निर्णयअमरावती : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमीवर अनुयायांची होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई दरम्यान सहा विशेष गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ६ ते ८ डिसेंबर दरम्यान मुंबईहून या गाड्या सुटणार असल्याची माहिती भुसावळ मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.दादर येथील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी ठेवण्यात आल्या असून या स्थळाचे दर्शन घेण्यासाठी लाखो अनुयायी जातात. विदर्भातून अनुयायांची चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईला ये-जा करणाऱ्या नियमित प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षणाचे तिकीट घेऊनही नियमित प्रवास करणाऱ्यांना जागा मिळत नाही. त्यामुळे १ ते १० डिसेंबर दरम्यान मुंबईकडे प्रवास करणारे अनेक नियमित प्रवासी रेल्वेने ये-जा करीत नाहीत. परिणामी रेल्वे प्रशासनाने यंदा सहा विशेष गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर ते मुंबई दरम्यान या विशेष गाङ्या धावणार आहेत. परतीच्या प्रवासाठी या रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याचे भुसावळ मध्ये रेल्वे वाणिज्य विभागाने कळविले. (प्रतिनिधी)मुंबईहून अशा सुटतील रेल्वे गाड्या६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते नागपूर (गाडी क्र. ०१०६९) ही गाडी सुटेल. ही गाडी नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. तसेच याच दिवशी गाडी क्र.०१०७१ ही छत्रपती शिवाजी टर्मिनस ते सेवाग्राम दरम्यानची गाडी सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांंनी सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी सेवाग्राम येथे सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. ७ डिसेंबर रोजी दादर ते नागपूर (गाडी क्र.०१०७३) दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. मुंबई ते नागपूर (गाडी क्र.०१०७५) ही दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार असून ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ३ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. ८ डिसेंबर रोजी दादर ते नागपूर (गाडी क्र. ०१०७३) ही रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी सुटणार असून नागपूर येथे ९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता पोहोचणार आहे.येथे थांबतील विशेष गाड्याछत्रपती शिवाजी टर्मिनस (मुंबई), दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, जलंब, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, अजनी, नागपूर.