शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येचा इशारा देणारे सहा जण ताब्यात

By admin | Updated: September 15, 2015 00:16 IST

अचलपूर येथील बहुचर्चित अमित बटाऊवाले हत्या प्रकरणासंदर्भात आत्महत्येचा इशारा देणाऱ्या युवा स्वाभिमानच्या सहा कार्यकर्त्यांना ...

अल्टिमेटमची मुदत संपली : नोटीस बजावून सोडले अमरावती : अचलपूर येथील बहुचर्चित अमित बटाऊवाले हत्या प्रकरणासंदर्भात आत्महत्येचा इशारा देणाऱ्या युवा स्वाभिमानच्या सहा कार्यकर्त्यांना सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना नोटीस बजावून सायंकाळी सोडण्यात आले आहे.अचलपूर येथील अमित बटाऊवाले हत्याप्रकरणी उच्चपदस्थ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी युवा स्वाभिमानचे मेळघाट संपर्कप्रमुख उपेन बछले यांनी सात दिवसांचा अल्टिमेटम विभागीय आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला होता. प्रकरणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप बछले यांनी केला होता. ज्या पध्दतीने लाठ्या-काठ्या व लोंखडी सळाखीने अमित बटाऊवालेची हत्या करण्यात आली. त्याप्रकारे आमचीदेखील हत्या करावी, यासाठी शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती. सात दिवसांत दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास तीच प्रशासकीय परवानगी समजून विभागीय आयुक्त कार्यालयात लाठी-काठी व सळाखीने आत्महत्या करण्याचा इशारा बछले व कार्यकर्त्यांनी दिला होता. ही मुदत संपल्यामुळे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात युवा स्वाभिमानच्या आंदोलनासाठी बछले व कार्यकर्ते उपस्थित असताना गाडगेनगर पोलिसांनी उपेन बछले, विनायक चव्हाण, गणेश शनवारे, अक्षय अग्रवाल, रविंद्र गायन, मोहन गायन, गणपत भाकरे यांना ताब्यात घेतले. त्यांना सायंकाळी नोटीस बजावून सोडण्यात आले आहे. (प्रतिनिधी)अचलपूर येथील अमित बटाऊवाले हत्या प्रकरणासंदर्भात कार्यकर्त्यांनी आत्महत्येचा इशारा दिला होता. याप्रकरणी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. - के.एम. पुंडकर, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर पोलीस ठाणे.