शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

‘चाणक्य’ला सहा लाखांचा दंड

By admin | Updated: July 24, 2015 00:19 IST

नागपूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या रहाटगाव येथील ‘हॉटेल चाणक्य’ला विनापरवानगी बांधकाम केल्याप्रकरणी सहा लाख रुपयांचा दंड आकारण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

नोटीस बजावली : विनापरवानगी बांधकाम, अतिक्रमण असल्याचा अहवाल‘आदित्य’चे मोजमाप आटोपले‘गौरी ईन’ या प्रशस्त हॉटेलच्या बांधकामासोबतच हॉटेल आदित्यच्या बांधकामाची तपासणी करण्यात आली आहे. ‘आदित्य’चे मोजमाप आटोपले असून तपासणी अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाईल, अशी माहिती सहायक संचालक नगररचना सुरेंद्र कांबळे यांनी दिली. अमरावती : नागपूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या रहाटगाव येथील ‘हॉटेल चाणक्य’ला विनापरवानगी बांधकाम केल्याप्रकरणी सहा लाख रुपयांचा दंड आकारण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्याबाबत सहायक आयुक्तांना कळविले आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका सहायक संचालक नगररचना विभागाने ‘हॉटेल चाणक्य’च्या बांधकामाची तपासणी केली असता नियमबाह्य पध्दतीने टिनाचे शेड उभारण्यात आल्याचे चमुच्या लक्षात आले होते. ‘चाणक्य’च्या बांधकामाचा तपासणी अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आला. हॉटेल चाणक्यच्या संचालकांनी अतिक्रमण करुन टिनाचे शेड उभारल्याचे तपासणी अहवालात नमूद होते. हे प्रकरण आयुक्तांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे पाठविले होते. या पथकाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे यांनी नोडल अधिकारी चव्हाण यांना ‘चाणक्य’च्या अतिक्रमित जागेबाबत अहवाल पाठविण्याचे कळविले आहे. पहिल्या टप्प्यात ६ लाख रुपये कराची दंडात्मक कारवाई असून सहायक संचालक नगररचना विभागाने अहवाल सादर केल्यानंतर पुन्हा दंडात्मक रक्कम वसूल केली जाईल. नोडल अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटविण्याबाबत कळविल्यास तशी कारवाई केली जाईल, अशी माहिती आहे. (प्रतिनिधी)