शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सहा कोटींचा दुष्काळ निधी शासनजमा

By admin | Updated: April 6, 2015 00:34 IST

यंदाच्या हंगामात अवेळी पावसामुळे शेती पिकाचे व फळपिकाचे नुकसान झाले.

उदासीनता : तीन तालुक्यांना पुन्हा सहा कोटींचे वाटपअमरावती : यंदाच्या हंगामात अवेळी पावसामुळे शेती पिकाचे व फळपिकाचे नुकसान झाले. शासनाने दुष्काळस्थिती घोषित करुन प्रचलित निकषानुसार शासन मदत घोषित केली. जिल्ह्याला दोन टप्प्यात २५१ कोटी ६१ लाख प्राप्त झाले. ३१ मार्चपर्यंत सर्व तालुक्यांत २४३ कोटींचा निधी वितरित करण्यात आला. शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या अडचणीमुळे ९ कोटी ३५ लाखांचा निधी शासनजमा करण्यात आला आहे. पाच टक्के शेतकऱ्यांचा हा निधी समर्पित झाला आहे.राज्य शासनाने जिल्ह्यात पहिल्या टप्यात ७ जानेवारीला १२५ कोटी ७९ लाखांचा निधी दिला. दुसऱ्या टप्यात २ फेब्रुवारीला १२५ कोटी ७९ लाखांचा निधी वितरित केला. जिल्हा प्रशासनाने २५१ कोटी ६३ लाखांचा निधी सर्व तालुक्याला वितरित केला. यामधून जिल्हा प्रशासनाला परत आलेल्या निधीपैकी आवश्यकता असणाऱ्या नांदगाव खंडेश्वर तालुक्याला १ कोटी २३ लाख, चांदूररेल्वे तालुक्याला ५ कोटी व वरुड तालुक्याला ६ कोटींचे वाटप करण्यात आला. ३१ मार्चपर्यंत २५१ कोटी ६३ लाखांपैकी २४३ कोटींचे वाटप करण्यात आले. याची टक्केवारी ९४ एवढी आहे. (प्रतिनिधी)