३ लाखांची नुकसान : दाभेरी येथील घटना रिद्धपूर : नजीकच्या दाभेरी येथील शेत शिवाराला रविवारी सकाळी अचानक आग लागल्याने सहा एकरातील तूर जळून खाक झाली. या आगीत ३ लाखांची हानी झाल्याचा अंदाज आहे. रिद्धपूर येथील शेतकरी जानराव मारोतराव हरणे यांच्या शेतातील दोन एकरातील तूर व त्यांच्याच शेताला लागून असणारे रामेश्वर वसंतराव कंटाळे यांच्या दोन एकरातील शेतातील तुरीच्या पिकाला अचानक आग लागल्याने सहा एकरातील तूर जळाली आहे. आसपासच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी आगीची माहिती अग्निशमन विभागाला दिली. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
सहा एकर शेतातील तुरीचे पीक भस्मसात
By admin | Updated: December 27, 2016 00:56 IST