शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वाघाचे दात आणि नखं जप्ती प्रकरणात सहा आरोपींना १५ पर्यंत वनकोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 15:27 IST

पूर्व मेळघाट वनविभागाने वाघाचे दात आणि नखं जप्ती प्रकरणात सहा आरोपींना अटक केली असून, अचलपूर न्यायालयातून त्यांनी १५ जानेवारीपर्यंत वनकोठडी मिळविली आहे.

- अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : पूर्व मेळघाट वनविभागाने वाघाचे दात आणि नखं जप्ती प्रकरणात सहा आरोपींना अटक केली असून, अचलपूर न्यायालयातून त्यांनी १५ जानेवारीपर्यंत वनकोठडी मिळविली आहे. यात वन चौकीदारासह खब-यालाही ताब्यात घेण्यात आले असून, आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे.  चिखलदरा वनपरिक्षेत्रांतर्गत मेमना नाल्यावर वाघ कुजून संपला होता. त्यावरील कातडीही नष्ट झाली होती. हा पट्टेदार वाघ असल्याची खात्री पटल्यानंतर लगेच त्याचे दात, नखं आणि हाड गोळा करण्यात आले. आॅगस्ट २०१८ च्या दरम्यानची ही घटना असल्याचे आरोपींचे म्हणणे आहे. तथापि, वनाधिकारी व कर्मचा-यांना याची माहिती नव्हती. संयोगाने वाघनखं आणि दात जप्तीसंदर्भात हे आरोपी हाती लागलेत आणि मेळघाटातील आणखी एक वाघ मेल्याचे निश्चित झाले. पकडलेल्या या सहा आरोपींमध्ये दोन आरोपी मेमना येथील, दोन मरियमपूरचे, एक चिखलद-याचा, तर एक धामणगाव गढीचा रहिवासी असल्याचे वृत्त आहे. यातील एक आरोपी वनविभागात अस्थायी पदावर राहिलेला चौकीदार, अन्य एक चिखलदरा व्याघ्र प्रकल्पाकरिता खबरी म्हणून काम करीत असल्याचे सांगितले जात आहे. वनकोठडी मिळविलेल्या आरोपींचा गिरगुटी प्रकरणात काही संबंध आहे का, या दृष्टीने चौकशी अधिकारी शोध घेत आहेत. आरोपींवर जागता पहारा वनकोठडीत असलेल्या आरोपींकरिता एक वनपाल आणि पाच वनरक्षकांचा समावेश असलेल्या पथकांना आठ-आठ तास तैनात केले आहे. कर्तव्यावर वनपाल, वनरक्षकांनी झोपू नये, असे निर्देशही देण्यात आले आहे. आरोपी आणि वनपाल, वनरक्षकांकरिता गाद्या आणि पांघरूणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. वनपाल, वनरक्षकांच्या पथकाचा २४ तास जागता पहारा आरोपींवर ठेवण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :AmravatiअमरावतीTigerवाघ