शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आमसभेत ‘सिंगल कॉन्टॅÑक्ट’चे फटाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 22:21 IST

साफ-सफाईचा ‘सिंगल कॉन्ट्रॅक्ट’ १६ आॅक्टोबरच्या आमसभेत अवलोकनार्थ ठेवला जाणार आहे. सप्टेंबरमध्ये स्थायी समितीने प्रभागनिहायऐवजी शहरातील स्वच्छतेचा कंत्राट एकाच कंपनीला देण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले.

ठळक मुद्देभाजपाच्या बैठकीकडे लक्ष : सत्ताधीशांना घेरण्याची विरोधकांची रणनीती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : साफ-सफाईचा ‘सिंगल कॉन्ट्रॅक्ट’ १६ आॅक्टोबरच्या आमसभेत अवलोकनार्थ ठेवला जाणार आहे. सप्टेंबरमध्ये स्थायी समितीने प्रभागनिहायऐवजी शहरातील स्वच्छतेचा कंत्राट एकाच कंपनीला देण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. मात्र संभाव्य विरोध लक्षात घेता तो प्रस्ताव मागील आमसभेत चर्चेस आला नाही. तथापि महिन्याभराच्या काळात पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेल्याने या विषयावर १६ आॅक्टोबरला आयोजित आमसभेत खडाजंगी अपेक्षित आहे.स्थायी समितीने शिक्कामोर्तब केल्यानंतर एकल कंत्राटाचा मुद्दा भाजपासाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. सभापती तुषार भारतीय यांनी आग्रहपूर्वक प्रस्ताव मंजूर करवून घेतला. विद्यमान कंत्राटदारांची मोनोपल्ली संपुष्टात आणण्यासाठी हा प्रयोग आपण राबविणारच, यावर भारतीय ठाम आहेत. स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजुरी देऊन भारतीय यांनी हा प्रस्ताव आमसभेत अवलोकनार्थ पाठविला आहे. मात्र स्वच्छतेचा कंत्राट प्रभागनिहाय न करता एकाच कंपनीला देण्याचा निर्णय धोरणात्मक असल्याने हा प्रस्ताव अवलोकनार्थ नव्हे, तर मंजुरीसाठी यावा, असे विरोधी पक्षाचे मत आहे. दुसरीकडे भाजपमधील अनेक नगरसेवकांचा या प्रस्तावाला असलेला विरोधही मावळत चालला आहे. स्थायीच्या निर्णयानंतर आता हा मुद्दा भाजपसाठी प्रतिष्ठेचा बनल्याने एकल कंत्राटाबाबत पक्षस्तरावरील निर्णयाला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे.तुषार भारतीय यांनी घेतलेला निर्णय आमसभेत फेटाळला गेल्यास भाजपमधील अंतर्गत बेबनाव चव्हाट्यावर येईल. मागील सहा महिन्यांपासून स्वच्छतेच्या कंत्राटाबाबत सत्ताधीश भाजप निर्णय घेऊ न शकल्याने शहरात अस्वच्छतेचा आगडोंब उसळल्याच्या मुद्यावर काँग्रेस, बसपा आक्रमक झाली आहे. त्यामुळे १६ च्या आमसभेत एकल कंत्राटावर मंजुरीचे फटाके फुटतात की, स्थायीने पाठविलेल्या प्रस्तावाचा फटाका मंजुरीअभावी ‘फुस्स’ होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात भाजपची भूमिका ठरावी, यासाठी शनिवारी किंवा रविवारी कोअर कमिटीसह भाजपजनांची बैठक होत आहे.

२२.२२ कोटींचा प्रस्तावतूर्तास महापालिका प्रशासन दैनंदिन साफ-सफाई तथा नाली सफाईवर १६ ते १७ कोटी रुपये खर्च करते. मल्टिनॅशनल कंपनीचा कंत्राट अंदाजे २२.२२ कोटींचा असेल. पाच वर्षांसाठी हा नवीन प्रयोग प्रस्तावित आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास सध्याची ४३ कंत्राटदारांची व्यवस्था संपुष्टात येईल.