शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

व्यक्तिमत्त्वातील सहजता हीच यशाची परिभाषा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:35 IST

गोड वाणी ओठांमधून प्रतिध्वनित होत असली तरी तिची निर्मिती आपुलकीच्या भावनेत होते. आपुलकीचा जन्म हा व्यक्तिमत्त्वातील सहजतेमुळे होतो, असे सूत्र सुनील झोंबाडे यांनी 'लोकमत'च्या वाचकांसाठी उलगडले.

ठळक मुद्देसुनील झोंबाडे : रतन टाटा रांगेत उभे असतात तेव्हा

अमरावती : गोड वाणी ओठांमधून प्रतिध्वनित होत असली तरी तिची निर्मिती आपुलकीच्या भावनेत होते. आपुलकीचा जन्म हा व्यक्तिमत्त्वातील सहजतेमुळे होतो, असे सूत्र सुनील झोंबाडे यांनी 'लोकमत'च्या वाचकांसाठी उलगडले.विदर्भाला पोल्ट्री क्षेत्र अपरिचित असताना, पहिला पोल्ट्री ब्रिडिंग फार्म अमरावतीत सुरू करण्याचे धाडस करून ती संकल्पना विदर्भाच्या मातीत रुजविणारे, पशुखाद्यनिर्माते आणि पंचतारांकित नांदगावपेठ एमआडीसी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील झोंबाडे सांगतात, सत्ता; पैसा; ताकद यामुळे जे साध्य होऊ शकत नाही, ते केवळ आपुलकीने संवाद साधल्यामुळे साध्य होते. गोड बोलण्याचे दोन प्रकार असतात. केवळ औपचारीकता नि सभ्यता म्हणून गोड बोलणे आणि मनापासून संवाद साधणे. दोन्ही प्रकार लाभप्रदच. परंतु, मला आकर्षित करतो तो दुसरा प्रकार. यशासोबत सहजता जपण्याचे कायम भान ठेवले की, इतरांप्रति आपुलकी बाळगणे सहजसाध्य असल्याचे नोंदवून विठ्ठल वाघ यांच्या कवितेच्या ओळींची ते आठवण करून देतात, ''जरी आले चंद्र सूर्य हाती, माणसाने विसरू नये पायाखालची माती''यशाच्या उत्तुंग शिखरावरही सहजतेने जगण्याचे अतुल्य उदाहरण सुनील झोंबाडे यांनी दिले. ते म्हणतात, मागच्या आठवड्यात मी दिल्ली विमानतळावर इकॉनॉमी श्रेणीच्या रांगेतील प्रक्रियेतून जात असताना बाजूच्या रांगेत चक्क रतन टाटा दिसले. विमान बाळगण्याच्या ऐपतीचा थोर उद्योजक इकॉनॉमी क्लासच्याच रांगेत उभा राहतो तीच सहजता, तेच यश...