शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

अमरावती जिल्ह्यात राष्ट्रसंतांना लाखो अनुयायांच्या उपस्थितीत मौन श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 19:30 IST

खंजिरी भजनांच्या माध्यमातून राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणारे युगपुरुष राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना त्यांच्या ५१ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शनिवारी गुरुकुंज मोझरी येथे मौन श्रद्धांजली देण्यात आली.

ठळक मुद्दे५१ वा पुण्यतिथी महोत्सव सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनारामदेवबाबांची उपस्थिती

अमित कांडलकर/सूरज दहाटअमरावती : खंजिरी भजनांच्या माध्यमातून राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणारे युगपुरुष राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना त्यांच्या ५१ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शनिवारी गुरुकुंज मोझरी येथे मौन श्रद्धांजली देण्यात आली. ४ वाजून ४८ मिनिटांनी येथे उपस्थित लाखोंचा जनसागर याप्रसंगी स्तब्ध झाला होता.विधानसभा निवडणुकीतील राजकीय प्रचार व ढगाळ वातावरणाची पर्वा न करता आपल्या गुरुमाउलीला मौनश्रद्धांजली अर्पण करण्यासाठी देशाच्या विविध भागातून लाखोंच्या संख्येने आलेल्या गुरुदेवभक्त व साधकांनी राष्ट्रसंतांना श्रद्धांजली अर्पण केली. वेळोवेळी अतिरेकी हल्ल्यात भारतीय लष्करातील शहीद झालेल्या जवानांनासुद्धा श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मौन श्रद्धांजलीचा मुख्य कार्यक्रम शनिवारी दुपारी ३.३० वाजता ‘गुरुदेव हमारा प्यारा, है जीवन का उजियारा’ या प्रार्थनागीताने आरंभ झाला. तीन तास लाखोंचा जनसमुदाय राष्ट्रसंतांचा विश्वात्मक विचार व त्यांच्या कार्याचा त्यातून मिळणाच्या ऊर्जेचा, दिव्यत्वाचा अनुभव घेत ध्यानस्थ बसलेला होता. ठीक ४.५८ मिनिटांनी शिस्तबद्धरितीने सर्व गुरुदेवभक्तांनी, साधकांनी महासमाधी स्थळाच्या दिशेने दोन्ही हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली. योगगुरू रामदेवबाबा यांनी पुण्यतिथी महोत्सवातील मुख्य सोहळ्याला हजेरी लावली.‘मै मानव जीवन की सुसाधना का कर्मयोग हूँ। मैं इस संसार को विश्वशांती का मार्गदाता हूँ’ हे भजन गाऊन व ‘राष्ट्रसंता जगत् गुरु कृपावंता’ ही आरती करण्यात आली. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी या सर्व धर्मांच्या प्रार्थना त्यांच्या धर्मगुरूकडून करण्यात येऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. श्रद्धांजली कार्यक्रमाचे नियोजन अध्यात्म विभागाचे प्रमुख राजाराम बोथे यांनी केले. गोपाल सालोडकर, किशोर अगडे, शीतल मांडवगडे, नीलेश इंगळे, रवि खंडारे, हरीश लांडगे, रामेश्वर काळे, प्रशांत ठाकरे, स्वप्निल बोबडे, यश यावले, शीतल बुरघाटे, जया सोनारे, शीतल तायडे, रश्मी भाटी, धनश्री खारोडे, स्वप्निल सरकटे, अरविंद गेडाम, प्रवीण काळे, घनश्याम काटकर यांनी विविध वाद्यांची व गायनाची साथसंगत केली.गुरुदेवभक्तांचा सोहळाराष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे अश्विन वद्य पंचमीला शुक्रवार, ११ ऑक्टोबर १९६८ रोजी सायंकाळी ४.५८ मिनिटांनी महानिर्वाण झाले होते. तेव्हापासून त्यांच्या विचाराचे सर्वधर्म पथातील भक्त व साधक या दिवशी श्रीक्षेत्र गुरुकुज आश्रमात एकत्र येऊन गुरुमाउलीला श्रद्धांजली अर्पण करतात. ५० वर्षांपासून श्रद्धांजलीचा सोहळा अविरतपणे होत आहे.नीरव शांततामौन श्रद्धांजली कार्यक्रमादरम्यान काही क्षणासाठी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थबकली. दुकानातील व्यवहार व भोंगे बंद करण्यात आल्यामुळे सर्वत्र नीरव शांतता होती. मुख्य मंडपातील शिस्त श्रीगुरुदेव विद्यामंदिर मानवसेवा छात्रालय, समता वसतिगृह यातील विद्यार्थी व शिक्षकांनी चोखपणे सांभाळली. पोलीस विभाग निवडणुकीच्या कामात व्यस्त असतानासुद्धा श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात बंदोबस्त ठेवून या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गावरून वळविली.पुढच्या वर्षी येणार - रामदेवबाबाराष्ट्रसंतांच्या भूमीवर येऊन महाराजांचे दर्शन झाले. यापुढे मी याठिकाणी नेहमीच येत राहणार. पुढच्या वर्षी मी तीन दिवस या ठिकाणी गुरुदेवभक्तांना योग शिकवेन. महाराजांची दूरदृष्टी अफाट आहे. म्हणूनच त्यांनी मानवता हा एकमेव धर्म सर्वांनी प्रामाणिकपणे जोपासावा, असे रामदेवबाबा याप्रसंगी म्हणाले. यावेळी रामदेव बाबा यांनी राजस्थानी भजन गायिले.

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज