शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग

By admin | Updated: September 23, 2016 00:12 IST

नियोजनबद्धता, शिस्त आणि नियोजनाचा आदर्श घालून देणाऱ्या ‘सकल मराठा’ समाजाच्या गुरूवारी

अनेकांच्या सुट्या : कार्यालयांत शुकशुकाटअमरावती : नियोजनबद्धता, शिस्त आणि नियोजनाचा आदर्श घालून देणाऱ्या ‘सकल मराठा’ समाजाच्या गुरूवारी निघालेल्या मूकमोर्चात शासकीय कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. शेकडो कर्मचारी कामाच्या ठिकाणी सुट्या टाकून मोर्चात सहभागी झाले होते. विविध शासकीय कार्यालयांत कार्यरत बहुतांश मराठा कर्मचाऱ्यांनी रीतसर सुटी घेतली होती. यामुळे शहरातील विविध शासकीय कार्यालयांत शुकशुकाट दिसून आला. जिल्हा परिषद, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण, विभाग व अन्य विभागातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारीच मोर्चात सहभागी होण्यासाठी आपापल्या विभागप्रमुखांकडे सुटीचे अर्ज केले होते. महिला कर्मचारीदेखील मोर्चात सहभागी झाल्या होत्या, हे विशेष. या मूकमोर्चात अनेक शिक्षक, प्राध्यापकांचा लक्षणीय सहभाग होता. अनेक शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अर्जित रजा, किरकोळ रजा आणि अर्ध्या दिवसाची रजा घेतली होती. बोटावर मोजण्याइतपत अधिकारी व कर्मचारी कार्यालयांत दिसून आले. शासकीय कार्यालयांत फेरफटका मारला असता सुटीच असल्याचा भास होत होता. (प्रतिनिधी)१५ चिमुकल्यांची पालकांपासून काहीवेळ ताटातूट, सुखरुप परतमराठी अस्मितेसाठी असलेल्या या मोर्चात लाखो मराठा बांधव सहकुटूंब सहभागी झाले होते. नेहरु मैदान परिसरातून रिदम रोशन साहू नामक चिमुकल्याची आई-वडिलांपासून ताटातूट झाली होती. रिदमला पोलिसांनी शहर कोतवाली ठाण्यात नेले. त्यानंतर तब्बल तासभराने त्याचे पालक रिदमला घेण्यास आले. त्याचप्रमाणे मोर्चादरम्यान इतर १५ चिमुकले पालकांपासून विलग झाले होते. या मुलांच्या नावाची गर्ल्स हायस्कूल चौकातील मंचावरून घोषणा करण्यात आली. त्यामुळे यासर्व मुलांना काही वेळातच पुन्हा आई-वडिलांचे सानिध्य मिळाले. गालबोट नाही, पोलिसांच्या कसोटीवर उतरले ‘सकल मराठा’!लाखो मराठे रस्त्यावर उतरले होते. मात्र, मराठ्यांचा हा मूकमोर्चा विधातक नाही, असा ठाम विश्वास पोलिसांना होता आणि त्या विश्वासावर मराठे खरे उतरले आहे. मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीचा असल्यामुळे लाखो मराठ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ दीड हजार पोलिसांनी सांभाळली. मराठ्याचा मूकमोर्चा अभूतपूर्व होण्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी परसली होती. त्यादृष्टीने पोलीस विभागाने नियोजनसुद्धा केले. मराठ्यांनी अन्य शहरात काढलेल्या मोर्चाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागले नाही, ही बाब अमरावती पोलिसांनाही माहिती होती. मराठ्यांच्या मोर्चात लाखो मराठे सहभागी होणार असल्याचे आधीच पोलीस विभागाला कळले होते. त्या अनुषंगाने पोलीस विभागाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सर्व ठाण्याचे कर्मचारी व ग्रामीण भागातील प्रत्येक ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी, असा केवळ दीड हजार पोलीस बंदोबस्ताकरिता सज्ज केला. मराठ्यांचा मोर्चा हा शांततेत पार पडणार असल्याचा विश्वास पोलिासांना होता. पोलिसांच्या या विश्वासावर मराठे खरे उतरला असून या मूकमोर्चात कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडली नाही. पीडीएमसीने पुरविली वैद्यकीय सेवा मराठा क्रांती मूकमोर्चाची व्याप्ती लक्षात घेता यात आबालवृद्ध सहभागी होणार, हे निश्चित असल्याने एखादवेळी आपत्कालीन स्थिती उदभवल्यास मोर्चेकऱ्यांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या चमुने शहरात पाच ठिकाणी प्रथमोपचार केंद्र उघडले होते. राजकमल चौक, इर्विन चौक, जयस्तंभ चौक व गर्ल्स हायस्कूल चौक व श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाजवळ नागरिकांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. यात बडनेरा येथील डॉ.अमोल वसू व पीडीएमसीच्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता.