शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वाक्षरी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:18 IST

शहराला आवश्यक असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीच्या पाठपुराव्यासाठी १ लाख स्वाक्षरींची मोहीम छेडण्यात येणार आहे. याद्वारे शासनाचे या विषयाकडे लक्ष वेधणार असल्याची माहिती आयएमए हॉलमध्ये बुधवारी आयोजित बैठकीत तज्ज्ञांची दिली.

ठळक मुद्देशासनाचे लक्ष वेधणार : आयएमए हॉलमध्ये बैठक, तज्ज्ञांची उपस्थिती

अमरावती : शहराला आवश्यक असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीच्या पाठपुराव्यासाठी १ लाख स्वाक्षरींची मोहीम छेडण्यात येणार आहे. याद्वारे शासनाचे या विषयाकडे लक्ष वेधणार असल्याची माहिती आयएमए हॉलमध्ये बुधवारी आयोजित बैठकीत तज्ज्ञांची दिली. या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ स्थानिक बाजार समितीमधून २० एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयोजक एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर होते. जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता पद्माकर सोमवंशी, ऋषीकेश नागलकर, डॉ. जयंत पांढरीकर, बबन बेलसरे, मिसाळ, हरिना नेत्रदान समितीचे मनोज राठी, शरद कासट, मधुसूदन उमीकर, लता देशमुख, व्यापारी आत्माराम पुरसवानी, दीपक दादलानी, धीरज बारबुद्धे यांच्यासह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ पदाधिकाऱ्यांची उपस्थित होती.अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, ही सर्वांची इच्छा आहे. अमरावती विभागातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या २४० प्रवेशांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी ते आवश्यकही आहे. यासंदर्भात बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक लक्ष नागरिकांच्या स्वाक्षºया घेऊन ते निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.दोन दिवसांपूर्वी जागेची पाहणी केली असून, लवकरच १०० एकर जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, असे किरण पातूरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या तज्ज्ञांसमोर चर्चाकाही दिवसांपूर्वी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या तज्ज्ञांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यात किरण पातूरकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आवश्यकता प्रतिपादित केली. त्यांच्यानुसार, नागपूर विभागात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ५५० जागा आहेत, तर अमरावती विभागात ३१० जागा आहेत. नागपूर विभागाच्या तुलनेत २४० जागांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी अंबानगरीत असे महाविद्यालय गरजेचे आहे. पहिल्या टप्प्यात २५० कोटींचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सकांनी तयार करून तो पालकमंत्री व जिल्हाधिकाºयांकडे सादर केला आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतर ४०० खाटांच्या इमारतीसाठी १५० कोटींचा प्रस्ताव पाठविला जाईल.