शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

बालमजुरी विरोधी दिनानिमित्त कलेक्टोरेटमध्ये स्वाक्षरी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:30 IST

जागतिक बालमजुरीविरोधी दिनानिमित्तच नव्हे, तर सातत्याने वर्षभर याविषयी काम व्हावे आणि बालमजुरी थांबविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : बालमजुरीविरोधात काम होणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जागतिक बालमजुरीविरोधी दिनानिमित्तच नव्हे, तर सातत्याने वर्षभर याविषयी काम व्हावे आणि बालमजुरी थांबविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी केले.राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातर्फे जागतिक बालमजुरीविरोधी दिनानिमित्त स्वाक्षरी अभियान व चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शैलेश नवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात झाले, त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, प्रकल्प संचालक प्रवीण येवतीकर यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी, प्रकल्पातील स्वयंसेवक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी चित्ररथावरील संदेशफलकावर बालमजुरीविरोधी संदेश लिहून स्वाक्षरी केली. सर्व अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांनीही संदेशलेखन व स्वाक्षरी केली.यावेळी बालमजुरीविरोधी पथनाट्याचे सादरीकरणही करण्यात आले. राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाकडून हे अभियान बसस्थानक चौक, राजापेठ चौक, गांधी चौक व पंचवटी चौकातून विविध भागांत राबविण्यात आले. ठिकठिकाणी पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. काशिराम चाळ, सुफी प्लॉट, रायपुरा, मोमिनपुरा, विलायतपुरा, बियाबानी, सिंधी कँप, आनंदनगर, अलीमनगर, औरंगपुरा, लालखडी, अजिजपुरा आदी विविध ठिकाणांहून स्वयंसेवक जमले होते. नागरिकांनीही या स्वाक्षरी अभियानाला मोठा प्रतिसाद दिला.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी