शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या भूगर्भाची बोअरद्वारे चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:10 IST

अमरावती : शहरात १० हजारांवर असलेल्या बोअरमुळे भूगर्भाची चाळण होत आहे. घरोघरी असलेल्या या बोअरद्वारे भूजलाचा वारेमाप उपसा होत ...

अमरावती : शहरात १० हजारांवर असलेल्या बोअरमुळे भूगर्भाची चाळण होत आहे. घरोघरी असलेल्या या बोअरद्वारे भूजलाचा वारेमाप उपसा होत असताना शहरात किती बोअर आहेत, याची माहितीच महापालिकेकडे उपलब्ध नाही. याशिवाय महापालिका कार्यक्षेत्रातील भूजलाची नोंद ‘जीएसडीए’द्वारा घेतली जात नसल्याची माहिती आयुक्त प्रशांत रोडे यांनी मंगळवारी दिली.

शहरातील भूजलाच्या नोंदी असणे महत्त्वाचे असल्याने भूजल सर्व्हेक्षण विभागाद्वारा शहरातील नोंदीदेखील घ्यायला पाहिजेत, या संदर्भात आपण पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरात काँक्रीट व डांबरीकरणाचे रस्ते असल्यामुळे शहराचा भूजलस्तर खालावत आहे. दोन वर्षांपूर्वी शहराचा भूजलस्तर खालावत असल्याचे लक्षात येताच तत्कालीन आयुक्त संजय निपाणे यांनी शहरातील वडाळी तलावाचा गाळ लोकसहभागातून काढण्याची मोहीम राबविली होती. याशिवाय महापालिकेतील प्रत्येक अधिकाऱ्यांकडे ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ असणे अनिवार्य केले व मोहिमेची सुरुवात स्वत:च्या निवासस्थानापासून केली होती. याशिवाय प्रत्येक शासकीय कार्यालयात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’असण्याबाबत पत्र देण्यात आले होते. महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक कार्यालयांनी ही यंत्रणा लावली होती. त्याचप्रमाणे शहरात निर्माणस्थ काँक्रीट रस्त्याच्या कामात भूजल पुनर्भरणाची सक्ती कंत्राटदाराला करण्यात आली होती. त्यामुळे शहराच्या भूजलस्तरात किती सुधारणा झाली, हे पाहण्यासाठी शहरातील भूजलाच्या नोंदी असणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बॉक्स

वाॅटर प्लँटधारकांना ‘रेन वॉटर हार्वस्टिंग’ची सक्ती

शहरात किमान ८० ते १०० थंड पाण्याचे कॅन विक्रेते आहेत. त्यांच्याकडे प्लँटसाठी बोअरद्वारा भूजलाचा उपसा केला जातो. त्यामुळे भूजल पुनर्भरणाची जबाबदारीदेखील त्यांच्यावर आहे. त्यामुळे या प्लॉटधारकांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य करण्यात आले होते व अनेकांचे प्लॉट सील करण्यात आले होते. आता दोन वर्षांपासून ही मोहीम ठप्प असल्याचे दिसून येते.

बॉक्स

खासगी बोअरद्वारे अमर्याद भूजल उपसा

शहरातील बहुतेक घरी नळाद्वारे पाण्याचा पुरवठा होत असताना बोअरदेखील आहे. शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा होत असल्याने घरोघरी बोअर मारण्यात आल्या आहेत व याद्वारे भूजलाचा अमर्याद उपसा होत आहे. शहरात किती बोअर आहेत याची कुठलीही माहिती प्रशासनाकडे नाही व याबाबत कुठलेही निर्बंध नसल्याने भूजलाचा अमर्याद उपसा होत असल्याचे वास्तव आहे.

कोट

महापालिका प्रशासनाकडे शासकीय बोअर यांची माहिती आहे. खासगीची नाही. महापालिका क्षेत्रातील भूजलाच्या नोंदी ‘जीएसडीए’कडे नाहीत. त्यांनी त्या घ्यायला पाहिजेत, यासाठी पत्र देणार आहोत.

- प्रशांत रोडे

आयुक्त, महापालिका

कोट

‘जीएसडीए’द्वारा तालुकास्तरावरील भूजलाच्या नोंदी घेतल्या जातात. महापालिका क्षेत्रातील नोंदी घेतल्या जात नाहीत. याशिवाय शहरात किती बोअर आहेत, याची माहिती आमच्या विभागाकडे नाही.

उल्हास बंड

भूवैज्ञानिक, जीएसडीए