शहरं
Join us  
Trending Stories
1
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
2
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
3
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
4
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
6
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
7
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
8
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
9
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
10
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
11
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
12
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
13
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
14
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?
15
प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात
16
SIP नं बनाल कोट्यधीश की PPF नं; ₹९५,००० वार्षिक गुंतवणूकीवर कोण बनवेल करोडपती, खरा चॅम्पिअन कोण?
17
AI मुळे नोकऱ्या धोक्यात? 'या' टेक कंपनीने एका झटक्यात ४,००० कर्मचाऱ्यांना काढले बाहेर!
18
आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल...
19
शीना बोरा हत्याकांडात १३ वर्षांनी मोठा ट्विस्ट! इंद्राणी मुखर्जीची मुलगी असं काय बोलली की केसची दिशाच बदलली?
20
मारुतीची नवी व्हिक्टोरिस SUV लॉन्च, फुल टँकमध्ये 1200Km पर्यंत धावणार! 5-स्टार सेफ्टी, 10.25-इंचांचे इंफोटेनमेंट अन् बरंच काही...

आजारी, दिव्यांग कर्मचारी पोहोचले स्ट्रेचरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 05:00 IST

समाजकल्याणमध्ये ब्रिक्स इंडिया प्रा.लि. पुणे या कंपनीकडे विविध कर्मचारी सेवा पुरविण्याचे कंत्राट शासनस्तरावरून देण्यात आले. मात्र, १९ महिन्यांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ईएसआयसी, पीएफची रक्कम कपात होत असताना ती त्यांच्या खात्यात जमा होत नाही. वैद्यकीय सेवा मिळत नाही. चार ते पाच कर्मचाऱ्यांना गंभीर आजार झाले.

ठळक मुद्देसमाजकल्याण उपायुक्त कार्यालय : मागण्या पूर्ण करवून घेण्यासाठी अशीही शक्कल, संमिश्र प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या कार्यालयात कार्यरत काही कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भविष्यनिर्वाह निधी, ईपीएफची रक्कम भरली नसल्याने त्यांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागले. चार ते पाच कर्मचाऱ्यांना कायम अपंगत्व आले. बुधवारी युवा सेनेने या कर्मचाºयांना स्ट्रेचरवर समाजकल्याण उपायुक्तांच्या दालनात नेल्याने गोंधळ उडाला. आंदोलनाच्या या प्रकाराबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.समाजकल्याणमध्ये ब्रिक्स इंडिया प्रा.लि. पुणे या कंपनीकडे विविध कर्मचारी सेवा पुरविण्याचे कंत्राट शासनस्तरावरून देण्यात आले. मात्र, १९ महिन्यांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ईएसआयसी, पीएफची रक्कम कपात होत असताना ती त्यांच्या खात्यात जमा होत नाही. वैद्यकीय सेवा मिळत नाही. चार ते पाच कर्मचाऱ्यांना गंभीर आजार झाले. काहींना कायमचे अपंगत्व आले, असे युवा सेनेने निवेदनात म्हटले आहे. अपंगत्व आलेल्या कंत्राटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची समाजकल्याण अधिकाºयांनी उपचारासाठी व्यवस्था करावी, अशी मागणी युवा सेनेने केली. आंदोलनादरम्यान पराग गुडधे, वैभव मोहोकार, बाळा सावरकर, विजय ठाकरे, प्रीती कडू, अर्चना मुदल, रेखा बागडे, नंदा अस्वार, चित्रा वानखडे हे उपस्थित होते.कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबतची जबाबदारी ही ब्रिक्स कंपनीकडे आहे. या एजन्सीला काळ्या यादीत टाकून कंत्राट रद्द करावे. वेतन अदा करू नये, असे आयुक्तांना कळविले आहे. .- विजय साळवे, प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण, अमरावती.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल