शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या निकालात सावळागोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 23:08 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेच्या निकालात सावळागोंधळ कायम आहे. अभियांत्रिकी, विधी, फार्मसी निकालाचा पत्ता नाही. अशातच एमसीएचे निकाल केव्हा लागणार, या विंवचनेत विद्यार्थी आहेत. त्यामुळे विद्यापीठाचा कारभार खरेच आॅनलाइन झाला काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देएमसीएचे निकाल नाहीच : अभियांत्रिकी, विधी, फार्मसीला प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेच्या निकालात सावळागोंधळ कायम आहे. अभियांत्रिकी, विधी, फार्मसी निकालाचा पत्ता नाही. अशातच एमसीएचे निकाल केव्हा लागणार, या विंवचनेत विद्यार्थी आहेत. त्यामुळे विद्यापीठाचा कारभार खरेच आॅनलाइन झाला काय, असा सवाल उपस्थित होत आहे.विद्यापीठाने परीक्षा विभागाचा कारभार आॅनलाइन केला आहे. मूल्यांकन, निकाल, प्रश्नपत्रिका आदी बाबी आॅनलाइन झाल्या आहेत. मात्र, निकालाची घसरगुंडी कायम आहे. हिवाळी परीक्षा आटोपून कधीचेच ४५ दिवस ओलांडले. फेब्रुवारी महिना उजाडला तरीही हिवाळी परीक्षांचे निकाल जाहीर झाले नाही. त्यामुळे उन्हाळी परीक्षांचे फार्म कधी भरावे, या विवंचनेत विद्यार्थी आहेत. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी आॅनलाईन, आॅफलाइन अशा दोन्ही प्रकारच्या हिवाळी परीक्षांना प्रारंभ झाला. ३ जानेवारी २०१९ रोजी शेवटचा पेपर आटोपला. यादरम्यान एकूण ५८७ अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात आल्यात. मात्र, नव्या विद्यापीठ कायद्यानुसार ४५ दिवसांतच निकाल जाहीर होणे अनिवार्य असताना त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष चालविले आहे. एमसीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी विद्यापीठात येरझारा मारून थकले आहे. निकाल कधी जाहीर होणार, हे परीक्षा विभाग ठामपणे सांगू शकत नाही, अशी एमसीए विषयाच्या विद्यार्थ्यांची ओरड आहे. गुरुवारी बी.ई.च्या पेपर ४ विषयांचे निकाल जाहीर होतील, अशी माहिती आहे. निकालात विलंब टाळता यावा, यासाठी सिनेट सभेने माइंड लॉजिककडून परीक्षेशी संबंधित कामे काढण्याचा निर्णय घेतला. आता नवी एजन्सी नियुक्त झाली असली तरी निकालात सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे. निकालात सावळागोंधळ असल्यामुळे विद्यार्थीदेखील त्रस्त झाले आहेत. हिवाळी परीक्षांचे निकाल प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांनी केव्हा परीक्षा अर्ज सादर करावा, अभ्यास कसा करावा, हा मोठा गंभीर प्रश्न आहे. एका एजन्सीकडे असलेला डेटा दुसऱ्या एजन्सीकडून ट्रान्सफर करण्यास किती काळ लागेल, हा बिकट प्रश्न आहे.अभियांत्रिकीचे निकाल जाहीर होत आहे. पुढच्या टप्प्यात एमसीएचे निकाल लावले जातील. काही तांत्रिक अडचणी असल्याने निकाल जाहीर करण्यास विलंब होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेत आहोत.- हेमंत देशमुखसंचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग, अमरावती विद्यापीठ