शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

सातपुड्याच्या कुशीत वसलेले श्रीक्षेत्र सालबर्डी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 01:28 IST

सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या श्रीक्षेत्र सालबर्डी येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरत असून, ही यात्रा मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेलगत भरते. श्रीक्षेत्र सालबर्डी येथे ४ मार्च रोजी एकादशीच्या पावन पर्वावर लहान महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून हजारो भाविक दाखल होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या श्रीक्षेत्र सालबर्डी येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरत असून, ही यात्रा मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेलगत भरते. श्रीक्षेत्र सालबर्डी येथे ४ मार्च रोजी एकादशीच्या पावन पर्वावर लहान महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून हजारो भाविक दाखल होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भाविकांची वाढती गर्दी पाहता, महाराष्ट्र व मध्यप्रदेश प्रशासनाच्यावतीने यात्रेदरम्यान तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.लहान महादेव या नावाने ओळखले जाणारे सालबर्डी हे स्थळ मोर्शीपासून आठ किलोमीटर अंतरावर असून, निसर्गाचा एक आगळावेगळा चमत्कारच आहे. गावाच्या अवतीभोवती घनदाट वृक्ष, एका कडेला पर्वतीय भाग व दुसऱ्या कडेला माडू व गडगा नदीचा संगम आहे. याठिकाणी अनेक निसर्गरम्य ठिकाणे, धार्मिक स्थळे व ऐतिहासिक शिल्प आहेत. त्यामध्ये शिवलिंग भुयार, पांडव कचेरी, मुक्ताबाईचे मंदिर, मौन्य देव मंदिर, हत्तीडोहाचा समावेश आहे. भारतात महादेवाची दोन शक्तिपीठे आहेत. पचमढीला मोठा महादेव, तर सातपुड्याच्या कुशीत वसलेला लहान महादेव. सालबर्डी येथे महाशिवरात्री महोत्सवाच्या काळात भक्तिभावाने भाविक त्रिशूल, डफडी व मुखी ‘महादेवा जातो गा’ या लोकगीताची आवर्तने करतो. यामुळे परिसर अक्षरश: दुमदुमून जातो. सालबर्डी गावापासून एक किलोमीटर अंतरावर चालत गेल्यावर पहिल्या पायरीपासून भुयाराकडे जाणारा मार्ग सुरू होतो. जवळपास शंभर फूट उतरल्यानंतर एका विशाल दगडाच्या आतल्या पोकळीत सपाट जागेवर शिवलिंग आहे. ४ मार्च रोजी एकादशीच्या पावन पर्वावर देशभरातून भाविक भक्तगण लहान महादेवाच्या दर्शनासाठी रीघ लावणार असून, त्या दृष्टीने महाराष्टÑ व मध्यप्रदेश प्रशासन अथक परिश्रम घेत आहे.

टॅग्स :Salbuldi Mahadev Mandirसालबर्डी महादेव मंदिरMahashivratriमहाशिवरात्री