निलेश भोकरे।लोकमत न्यूज नेटवर्ककरजगाव : परतवाडा शहरालगतच्या व जैनांची काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मध्यप्रदेशातील मुक्तागिरीने हिरवा शालू पांघरला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून सुरु असलेल्या रिमझिम व संतत धार पावसाने मुक्तागिरीच्या चहुकडे असणारा सातपुडा पर्वत हिरवागार झाला आहे. तर २५० फूट उंचावरून कोसळणारा मनमोहक धबधबा मन मोहून टाकणारा आहे.श्रावणात जैन श्रावक तसेच पर्यटकांची पावले मुक्तागिरीकडे वळली आहेत. मात्र कोरोनामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे. सातपुडयच्या कुशीत वसलेले ५२ शुभ्र रंगाचे पुरातन मंदिरे अद्वितीय शिल्पकलेचा नमुना आहेत. ही मंदिरे, हिरवागार पर्वत, धबधबे, शांत शुभ्र वाहणारी नाग नदी अतिशय रमणीय व नयनरम्य व मनाला शांती देणारे हे ठिकाण आहे. २५० फुटांवरून कोसळणारा शुभ्र असा धबधबा व त्याचे उडणारे तुषार जैन श्रावक व पर्यटकांना आकर्षित करतात. परंतु कोरोना मुळे प्रवेशबंदी असल्याने सर्वांचा हिरमोड झाला.जैनांची काशी संबोधल्या जाणाऱ्या मुक्तागिरीला संपूर्ण भारतातून श्रावक येत असतात. तेथे त्यांच्या करिता संस्थानतर्फे निवासाची उत्तम व्यवस्था आहे. जेवणाकरिता जैनी मेस आहे. कार्तिकी पौर्णिमेला येथील ५२ मंदिराच्या शृंखलेतील दहाव्या क्रमांकांच्या मंदिर व परिसरातील पहाडावर केशरचा पाऊस पडत असल्याची श्रध्दा आहे. ५२ मंदिरंची परिक्रमा करण्याकरिता २५० पायऱ्या चढाव्या लागतात. तर उतरतेवेळी ३५० पायऱ्यांनी खाली यावे लागते. कार्तिकी पौर्णिमेला येथे रथोत्सव साजरा होतो. सध्या पर्वाधिराज पर्युषण पर्वास सुरूवात झाली आहे. मात्र कोरोनाची सावट असल्याने सर्वत्र सामसूम आहे.
श्री सिध्दक्षेत्र मुक्तागिरीने पांघरला हिरवा शालू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:00 IST
श्रावणात जैन श्रावक तसेच पर्यटकांची पावले मुक्तागिरीकडे वळली आहेत. मात्र कोरोनामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे. सातपुडयच्या कुशीत वसलेले ५२ शुभ्र रंगाचे पुरातन मंदिरे अद्वितीय शिल्पकलेचा नमुना आहेत. ही मंदिरे, हिरवागार पर्वत, धबधबे, शांत शुभ्र वाहणारी नाग नदी अतिशय रमणीय व नयनरम्य व मनाला शांती देणारे हे ठिकाण आहे. २५० फुटांवरून कोसळणारा शुभ्र असा धबधबा व त्याचे उडणारे तुषार जैन श्रावक व पर्यटकांना आकर्षित करतात.
श्री सिध्दक्षेत्र मुक्तागिरीने पांघरला हिरवा शालू
ठळक मुद्देपर्युषण पर्वाला सुरूवात : श्रावक, पर्यटकांचा भुरळ, कोरोनामुळे प्रवेशबंदी