शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

श्री हव्याप्र मंडळात भिंत फोडून १२ शिलाई मशिनची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 23:27 IST

तीन ठिकाणी भिंतीला छिद्र करून अज्ञात चोरांनी १२ शिवणयंत्रे लंपास केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तीन ठिकाणी भिंतीला छिद्र करून अज्ञात चोरांनी १२ शिवणयंत्रे लंपास केल्या. ही घटना मंगळवारी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ परिसरातील महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत घडली. राजापेठ पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांच्या आधारे तपास सुरू केला.भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालय व बँक आॅफ महाराष्ट्रच्या मार्डेफ ट्रस्टद्वारे महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे कामकाज चालते. महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने या प्रशिक्षण संस्थेत महिलांना नि:शुल्क शिवणयंत्र प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी या प्रशिक्षण संस्थेत १३ शिवणयंत्रे उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या संस्थेतून शेकडो महिलांनी स्वयंरोजगाराचे धडे गिरवले आहेत. सोमवारी सायंकाळी प्रशिक्षण केंद्र बंद झाल्यावर मंगळवारी सकाळी अनिलकुमार रामाधीन मंडळ (५९, रा. दत्तवाडी) यांनी उघडले असता त्यांना प्रशिक्षण केंद्रात शिवणयंत्रे नसल्याचे निदर्शनास आले. राजापेठ पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्रशिक्षण केंद्रातील एका कार्यशाळा हॉल, क्लासरूम हॉल व कार्यालयातून १२ शिवणयंत्रे, एलसीडी व एक इर्न्व्हटर असा एकूण ३८ हजारांचा माल लंपास केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविच्या कलम ४६१, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला. अधिक तपास सुरू आहे. हव्याप्र मंडळाची सुरक्षा भेदून करण्यात आलेल्या या धाडसी चोरीबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.औरंगपुºयाजवळील नाल्यातून आलेत चोरस्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या मागील बाजूस अंबा नाला असून त्याशेजारीच औरंगपुरा परिसर आहे. चोरटे हे नाल्यातून प्रशिक्षण कक्षात शिरल्याचा संशय होता. मात्र, नाल्यातील चिखलातून प्रशिक्षण संस्थेपर्यंत पोहोचणे शक्य नसल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला.नियोजित चोरीज्या व्यक्तीला प्रशिक्षण केंद्राची इत्यंभूत माहिती आहे, अशाच व्यक्तीने प्रिप्लॅनिंग चोरी केल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. प्रशिक्षण केंद्रावरील चौकीदार ड्युटी करून सकाळी घरी गेला. त्यालाही या चोरीसंदर्भात भनक लागली नव्हती. त्याचीही पोलीस चौकशी करणार आहे.शिलाई मशिन चोरी गेल्याच्या घटनेत अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला. नाल्यात गाळ असल्याने तेथून चोर येणे शक्य नाही. दाराचे कुलूप तुटलेले नाही. चोर शातीर असून सर्व बाजू तपासून चौकशी सुरु आहे.- किशोर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, राजापेठ