शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणी खांडे जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2022 05:00 IST

होलिक्रॉस इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी श्रावणी खांडे हिने ग्रेस गुण वगळता ९९.२० टक्केवारी मिळवित जिल्ह्यातून ‘अव्वल’ येण्याचा बहुमान पटकावला आहे. तिने ४९६ गुण मिळविले आहेत. अमरावती येथील मणीबाई गुजराती हायस्कुलची सृष्टी भारती हिने ग्रेसगुणांसह ९९.६० टक्के गुण पटकावले असून, ती दुसऱ्यास्थानी आहे. अंबापेठस्थित मदर्स पेठ स्कूलचा तारक गुल्हाने, तर अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई कन्याशाळेची सुरभी पटेल या तिघांनीही कलागुणांसह ९९.२० टक्के गुण मिळवत जिल्हाभरातून तिसऱ्यास्थानी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च, एप्रिल २०२२ या महिन्यात घेण्यातआलेल्या इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन घोषित करण्यात आला. यात येथील होलिक्रॉस इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी श्रावणी खांडे हिने ग्रेस गुण वगळता ९९.२० टक्केवारी मिळवित जिल्ह्यातून ‘अव्वल’ येण्याचा बहुमान पटकावला आहे. तिने ४९६ गुण मिळविले आहेत. अमरावती येथील मणीबाई गुजराती हायस्कुलची सृष्टी भारती हिने ग्रेसगुणांसह ९९.६० टक्के गुण पटकावले असून, ती दुसऱ्यास्थानी आहे. अंबापेठस्थित मदर्स पेठ स्कूलचा तारक गुल्हाने, तर अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई कन्याशाळेची सुरभी पटेल या तिघांनीही कलागुणांसह ९९.२० टक्के गुण मिळवत जिल्हाभरातून तिसऱ्यास्थानी आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच दहावीच्या ऑफलाइन परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे आपसूकच जे विद्यार्थी हुशार, गुणी होते, ते निकालात झळकले. मात्र, यंदा काही नामांकित शाळांचाही निकाल घसरल्याचे वास्तव आहे.

अमरावती जिल्ह्याचा निकाल ९६.३९ टक्केयंदा जिल्ह्यात दहावीत उन्हाळी परीक्षेसाठी ३९ हजार १११ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी ३८ हजार ४२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, ३७ हजार ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९६.३९ टक्के एवढी आहे. जिल्ह्यात इयत्ता दहावीपर्यंतच्या ७४५ शाळा आहेत. मुलांपेक्षा मुलींनीच निकालात बाजी मारल्याचे टक्केवारीवरून स्पष्ट झाले आहे.

कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाइन परीक्षाकोरोनानंतर पहिल्यांदाच यंदा दहावीची परीक्षा ऑफलाइन झाली. शिक्षणाचा कंटाळा आलेल्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा नकोशी होती. त्यामुळे नामंवत शाळांचा निकाल घसरला आहे. मात्र, ज्या शाळांनी निकालाची टक्केवारी कायम ठेवण्याचे लक्ष्य होते, ३०८ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा सुरूनिकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणात येण्याची शक्यता पाहता शिक्षण मंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा आठ दिवस सकाळी ८ ते रात्री ८  या वेळेत भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क केले जाईल.

 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल