शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीच्या सात उपअभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस

By जितेंद्र दखने | Updated: July 20, 2024 00:36 IST

कार्यकारी अभियंत्यांनी मागविला तीन दिवसांत खुलासा

अमरावती : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या सात उपअभियंत्यांना इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्गावरील पूल, मोऱ्या व रपट्यांचे प्री-मान्सून निरीक्षण करण्याचे आदेश गत मे महिन्यात दिले होते. केलेल्या निरीक्षणाचा अहवाल सादर करण्याच्या लेखी स्वरूपात सूचना दिल्या असताना याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वरील सात उपअभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. तीन दिवसांत याबाबत खुलासा मागविला आहे.

जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या ग्रामीण भागातील इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग या रस्त्यावरील पूल, मोऱ्या, रपटे यांचे प्री-मान्सून निरीक्षण करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १४ मे राेजी दिले होते. त्यानुसार कार्यकारी अभियंता यांनी बांधकाम विभागाचे सातही उपअभियंता यांना १६ मे रोजी लेखी आदेश देऊन उपविभागांतर्गत येणाऱ्या वरील रस्त्यांची मान्सून पूर्व निरीक्षण करून धोकादायक तथा क्षतिग्रस्त असलेले रपटे, मोऱ्या, पूल यांना चिन्हांकित करण्यात यावे, त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे बजाविले होते. 

सोबतच सदर कामे योग्य त्या कार्यक्रमात प्राधान्याने प्रस्तावित करावी व उपविभागाच्या अधिनस्त असलेल्या शाळा, आरोग्य केंद्र, अंगणवाडी, ग्रामपंचायत भवन आदी इमारतींची पाहणी करून धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीबाबत माहिती तयार करून त्याबाबतचा अहवाला मागविला होता. मात्र, यासंदर्भातील अहवाल सादर न केल्याने याप्रकरणी सातही उपअभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविला आहे.जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या सात उपविभागांतील रपटे, मोऱ्या, पूल व शाळा, अंगणवाडी व आरोग्य केंद्राच्या इमारतींचे प्री-मान्सून निरीक्षण करून उपअभियंत्यांमार्फत अहवाल मागविला होता. मात्र, अहवाल अप्राप्त असल्याने कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविला आहे.-दिनेश गायकवाड, कार्यकारी अभियंता, बांधकाम 

टॅग्स :Amravatiअमरावती