शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्टसर्किटने तीन एकरांतील गहू खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:09 IST

शहरालगतच्या नवबाग शिवारात महावितरणच्या डीबीवरील शॉर्टसर्किटने एका शेतकऱ्याचा तीन एकरांतील गहू व चारशे संत्राझाडे जळून खाक झाली. २७ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्दे४०० संत्रा झाडे जळाली : नवबाग शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअचलपूर : शहरालगतच्या नवबाग शिवारात महावितरणच्या डीबीवरील शॉर्टसर्किटने एका शेतकऱ्याचा तीन एकरांतील गहू व चारशे संत्राझाडे जळून खाक झाली. २७ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.येथील शेतकरी सुरेश जयसिंगपुरे यांचे नवबाग शिवारात चार एकर शेत आहे. त्यापैकी त्यांनी तीन एकरांत गव्हाची पेरणी केली होती. नियमित पाणी पीक वाढविले. काढणीवर आलेला गहू त्यांनी एक दिवस आधीच संवंगणी करून पिंडे बांधले होते. त्यांच्या शेताच्या बांधावर असलेल्या डीबीवर शॉर्टसर्किट होऊन काढणीस आलेला तीन एकरांवरील गहू पूर्णत: जळून खाक झाला. तसेच त्यांच्या शेतातील तीन वर्षे वयाची संत्रा झाडेसुद्धा जळाली. यात त्यांचे अंदाजे एक लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदर डीबी उघडी असल्याचे त्यांनी महावितरणला कळविले होते. त्यामुळे या नुकसानीस महावितरण जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अचलपूर तालुक्यातील जवळपास सर्वच डीबी उघड्या आहेत. त्यांना झाकणे नाहीत. त्या किटकॅट, फ्युज नसलेल्या आहे. अनेक ठिकाणी तारा लोंबकळत आहेत. दरम्यान जयसिंगपुरे यांच्या शेतात झालेल्या नुकसानाचा पंचनामा करून त्यांना त्वरित मदत देण्याची मागणी प्रहारचे तालुकाध्यक्ष महेश सुरंजे यांनी केली आहे.