शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यात वाचले ३१ प्रवाशांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:17 IST

रस्त्यावर धावणारी बस अचानक घाटवळणाच्या चढावर बंद पडली. ती मागे येऊन दरीत कोसळेल, असे क्षणभर वाटले. प्रवाशांच्या काळजात धस्स झाले. मात्र, चालकाने अनुभव पणाला लावून बस थांबविली आणि तातडीने प्रवाशांना खाली उतरण्याची सूचना केली. त्यांच्या समयसूचकतेने ३१ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले.

ठळक मुद्देचालकाची समयसूचकता : परतवाडा आगाराची मेळघाटात भंगार बस सेवा

चिखलदरा : रस्त्यावर धावणारी बस अचानक घाटवळणाच्या चढावर बंद पडली. ती मागे येऊन दरीत कोसळेल, असे क्षणभर वाटले. प्रवाशांच्या काळजात धस्स झाले. मात्र, चालकाने अनुभव पणाला लावून बस थांबविली आणि तातडीने प्रवाशांना खाली उतरण्याची सूचना केली. त्यांच्या समयसूचकतेने ३१ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले.हृदयाचा थरकाप उडविणारा ही घटना रविवारी दुपारी ३ वाजता मोथा गावानजीकच्या सेल्फी पॉइंट वळणावर घडली. एमएच ४० एन ८९३० या क्रमांकाची बस प्रवाशांना घेऊन चिखलदराला जात असताना सेल्फी पॉइंटखालील वळणावर अचानक नादुरुस्त होऊन थांबली. उंच भागावर थांबलेली ही बस मागे येऊ लागल्याने त्यामधील प्रवाशांनी एकच गलका केला. तथापि, चालकाने समयसूचकता दाखवून बस थांबविली. क्षणाचा विलंब न करता प्रवासी बस खाली उतरले. या बसमध्ये जवळपास ३१ प्रवासी होते. रस्त्यावर थांबलेल्या या बसमुळे वाहतुकीला खोळंबा झाला. काही पर्यटकांनी या बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत केली. यासंदर्भात परतवाडा आगाराचे प्रमुख अनिकेत बल्लाळ यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.फौजदारीची मागणीपरतवाडा आगारातील ७० बसच्या बहुतांश फेºया धारणी व चिखलदरा तालुक्यातील आदिवासी भागांमध्ये चालविण्यात येत असल्याचे परिवहन महामंडळाचे म्हणणे आहे. या बसफेºया अनियमित आहेत. नादुरुस्त बस मेळघाटात पाठवणाºया अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत आहे.आगाराची हेकेखोरीपरतवाडा आगारातून मेळघाटात नादुरुस्त व भंगार बसगाड्या पाठविल्या जातात. घाटवळणावर बस नादुरुस्त होण्याचे प्रकार वारंवार घडत असतानाही परतवाडा आगाराला जाग आलेली नाही.