मोर्शीत फिटनेस क्लब
मोर्शी : कोरोना काळात फिटनेस क्षमता अबाधित राहावी. त्यासाठी ‘करा योग रहा निरोग’ हा संदेश समोर ठेवून मोर्शी शहरात युवकांसाठी फिनिक्स फिटनेस क्लब या जीमचे उद्घाटन मिस्टर इंडिया शुभम कडू यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी शंतनू बेले, कविता पाटील उपस्थित होते. क्रांती महिला विकास संस्थेच्या माध्यमातूनसुद्धा मोर्शी शहरात महिलांकरिता जिम, योगा, झुंबा अशा प्रकारचे प्रशिक्षण सुरू आहे.
------------------
फोटो पी १२ हिवरखेड
हिवरखेड येथे पशुपालकांना मार्गदर्शन
मोर्शी : नजीकच्या हिवरखेड येथे कृषी महाविद्यालयातील डॉ. दुबळे, प्रा. शिंगणे, प्रा. राठोड यांच्या मार्गदर्शनात पशुपालकांना लसीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तथा जनावरांना लसीकरण करण्यात आले. कोंघाटा केळापूर येथील विद्यार्थी प्रीतम मेश्राम यांनीसुद्धा पशू लसीकरणाचा कार्यक्रम गावात राबविला. या लसीकरण व मार्गदर्शनाचा लाभ परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी घेतला.
----------------------