शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

दुकानदार भररस्त्यात थाटतात दुकाने

By admin | Updated: May 28, 2016 00:13 IST

जुळ्या शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या सदर बाजाराला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे.

पालिकेचे दुर्लक्ष : सदर बाजार अतिक्रमणाच्या विळख्यातसुनील देशपांडे अचलपूरजुळ्या शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या सदर बाजाराला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. त्यात दुकानदार रस्त्यावर दुकाने थाटून बसल्याने हा रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करीत वाहने चालवावी लागतात. इतकेच नव्हे, तर पादचाऱ्यांचा जीवदेखील टांगणीला लागला आहे. येथील काही दुकानदारांचे नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांशी साटेलोटे असल्याने अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत असल्याची परिसरात चर्चा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते विदर्भ मिलपर्यंतचा राज्य महामार्ग दुभाजक सौंदर्यीकरणासाठी रस्त्यावरील अतिक्रमण हटाओ मोहीम मागील दोन दिवसांपासून राबवून मोकळा केला आहे. याच अतिक्रमणामुळे गेल्या एक महिन्यापूर्वी १५ दिवसांत चार जणांना अपघातात जीव गमवावा लागला. सा.बां. विभागाने अतिक्रमण काढले. पण अजूनही अचलपूर नगर परिषदेला जाग आलेली नाही.सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने बाजारपेठेत चांगलीच गर्दी असते. परतवाडा येथील सदर बाजार हा बाजारपेठेतील मुख्य भाग आहेत. येथे सर्वच वस्तूंची व कापडाची विक्रीची दुकाने आहे. काही दुकानदार आपली दुकाने मांडतात. त्यामुळे अगोदरच अतिक्रमणाच्या व हातगाड्यांच्या विळख्यात सापडलेला रस्ता अधिक अरुंद होतो. बहुतांश दुकानांसमोर पार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्याचे वोन उभे करण्याची वेळ ग्राहकांवर येत. काही दुकानदार विक्रीसाठी असलेले साहित्य रस्त्यावर तर मांडतातच; सोबत दुकानासमोर हातगाडी लावून माल सजवतात.एक दुकानदार दुकानातील माल एकावर एक रचून रस्त्यात मांडतो. येथून जाणाऱ्या वाहन धारकाला अक्षरश: कसरत करत येथून वाहन न्यावे लागते. एखाद्या वाहनधारकांचा या मालाला धक्का लागल्यास तो खाली पडतो. तेव्हा या दुकानातील दोन भाऊ व काम करणारे कर्मचारी या वाहनधारकाला मारहाण करतात. वरून पोलिसात देण्याची धमकीही देतात. पोलिसांशी त्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याने रस्त्यावर माल असल्यावरही ते कारवाई करीत नाहीत, असे जनतेचे म्हणणे आहे.पालकमंत्र्यांचा आदेश गेला कुठे ?पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी अचलपूर पतरवाड्यातील अतिक्रमण हटविण्यासाठी अनेकवेळा नगरपालिका सा.बां. विभाग, महसूल विभाग यांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. बैठकाही घेतल्या. अनेकदा तंबी दिली, मात्र त्याचा काहीही परिणाम नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर झालेला दिसत नाही. जे अधिकारी पालकमंत्र्याच्या आदेशाला जुमानत नाही ते सर्वसामान्याची काय समस्या ऐकत असतील, असा सवाल जनता करीत आहे. मेळघाट बाजारपेठमेळघाटसह अचलपूर तालुक्याची परतवाडा हीच बाजारपेठ असून सदर बाजार हा त्याचा मुख्य भाग असल्याने तो अतिक्रमणमुक्त असावा, पण काही दुकानदार रस्त्यात माल मांडत असून नगर पालिकेचे अधिकारी त्याकडेदुर्लक्ष करीत असल्याने खरेदीसाठी येणारा ग्राहक त्रस्त झाला आहे. याकडे नगरपालिकेचे व पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे, असे मत माधुरी शिंगणे, वर्षा हिरुळकर, विवेक मालगे, सुधीर गुल्हाने, महेश शेरेकर, संदीप देंडव, आकाश तंतरपाळेंसह आदींनी व्यक्त केले आहे.