शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मद्यविक्रीची ‘ती’ दुकाने सुरु होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 22:51 IST

राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाच्या ५०० मीटर परिसरातील दारुबंदी करण्याचा १५ डिसेंबर २०१६ रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

ठळक मुद्देदारु विक्रेत्यांना ‘अच्छे दिन’: न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाच्या ५०० मीटर परिसरातील दारुबंदी करण्याचा १५ डिसेंबर २०१६ रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाचे आदेश महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या हद्दीतील परवानाधारक दारु दुकानांसाठी लागू होणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात यापूर्वी बंद झालेले ३९८ दारु विक्रीचे दुकाने पूर्ववतपणे सुरु होतील, असे गृहित आहे. याबाबत राज्य सरकार २९ आॅगस्ट रोजी भूमिका स्पष्ट करणार असून तसे संकेत उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले आहेत.जिल्ह्यात मद्यविक्रीचे ४८२ परवाने असून त्यापैकी ३९८ मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात आले असून शहरात १३९ दुकाने आहेत. दरम्यान काही दुकाने स्थलांतरीत झाले असून काही मद्यविक्रेत्यांनी दुकानांचे प्रवेशद्वार बदलून न्यायालयाच्या आदेशापासून ‘मार्ग’ शोधला. दरम्यान चंदीगड प्रशासनाने त्यांच्या क्षेत्रातील दारु दुकानांसाठी एक अधिसूचना काढून महामार्गाचा दर्जा बदलला होता. त्याला पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. याप्रकरणी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश जे.एस. खेहर, न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. नागेश्वरा राव यांच्या पूर्णपीठाने चंदीगड प्रशासनाने काढलेल्या अधिसूचनेमुळे के. बालू विरुद्ध तामिननाडू सरकार प्र्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने १५ डिसेंबर २०१६ ला महामार्गावरील दारुबंदीसंदर्भात पारीत केलेल्या आदेशाचे उल्लंघन होत नाही. शिवाय महामार्गावरील ५०० मीटर परिसरात दारुची विक्री व पुरवठा यावर बंदीसाठी आहे. याचाच अर्थ एका शहरातून दुसºया शहराला किंवा गावांना जोडणाºया रस्त्यांसाठी तो आदेश लागू असून नागरी क्षेत्रासाठी परवानाधारक दुकानांसाठी लागू होणार नाही, असे स्पष्ट करीत याचिका फेटाळली होती. सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश ११ जुलै २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.३१ मार्चपासून बंद होती दुकानेसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५०० मीटरच्या अंतरावरील सर्व प्रकारची दारु विक्रीची दुकाने ३१ मार्च २०१७ पासून बंद आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ३९८ दुकानांना टाळे लागले. अखेर पाच महिन्यांच्या कालावधीतनंतर दारु विक्रेत्यांना ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात दारु विक्रीचे दुकाने सुरु केले जातील, असे चित्र आहे. शहरात एकूण १३९ दारु विक्री परवाने असल्याचे ‘एक्साईज’ ने स्पष्ट केले आहे.सर्वोच्च न्यायालयाचा ‘तो’ आदेश महापालिका, पंचायत समिती, नगरपंचायत हद्दीतील रस्त्यांसाठी लागू नाही. त्यामुळे न्यायालयाच्या नव्या आदेशाप्रमाणे दारु दुकाने पुन्हा सुरु होतील.चंद्रशेखर बावनकुळेउत्पादन शुल्क मंत्री, महाराष्ट्र