शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जेरबंद करता येत नसेल तर ‘शूट’ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 01:24 IST

नरभक्षक वाघाने मंगरूळ दस्तगीर व अंजनसिंगी येथे दोन नागरिकांना ठार केल्यानंतर गुरुवारी पहाटे तिवसा तालुक्यातील रघुनाथपूर येथे एका वासराला ठार केले. नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर यांची वनमंत्र्यांकडे मागणी

तिवसा तालुक्यात प्रचंड दहशतलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नरभक्षक वाघाने मंगरूळ दस्तगीर व अंजनसिंगी येथे दोन नागरिकांना ठार केल्यानंतर गुरुवारी पहाटे तिवसा तालुक्यातील रघुनाथपूर येथे एका वासराला ठार केले. नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. याच मार्गाने शेकडो पालख्या व हजारो नागरिक राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवाला जाणार आहेत. त्यामुळे ‘त्या’ नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करा अथवा ठार मारण्याचे आदेश द्या, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी सकाळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे दूरध्वनीद्वारे केली.गुरुवारी पहाटे या वाघाने रघुनाथपूर येथील प्रभाकर वानखडे या शेतकऱ्याचे वासरू ठार केल्याची बाब कळताच आ. यशोमती ठाकूर यांनी तात्काळ घटनास्थळी घाव घेतली. चार दिवसांवर असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यातील मौन श्रद्धांजलीच्या पार्श्वभूमीवर लाखो नागरिकांचा वावर या ठिकाणी राहणार असल्याने त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधला. यवतमाळ येथे १३ नागरिकांना ठार केल्यानंतर त्या वाघिणीला मारण्याचे आदेश देण्यात आले. येथेही शासनाला १३ नागरिकांचे बळींची प्रतीक्षा आहे काय, असा संतप्त सवाल त्यांनी वनमंत्र्यांकडे केला. या वाघाने पाच दिवसांत दोन नागरिक, गाय, म्हैस, वासरांना ठार केले. यामुळे कुºहा, तिवसा, वºहा, मोझरी, अनकवाडी, रघुनाथपूर, मालधूर, माळेगाव, घोटा, अंजनसिंगी परिसरात प्रचंड दहशत आहे. वाघाच्या भीतीने नागरिक शेतात जायची हिंमत करीत नसल्याने पिकेदेखील धोक्यात आलेली आहेत. शासनाने गंभीर दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा आ. ठाकूर यांनी दिला.कायदा हाती घेतल्यास शासन जबाबदारआठ दिवसांपासून नरभक्षक वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. नागरिकांचे जीव जाताहेत. तिवसा तालुक्यात प्रचंड दहशत आहे. या पार्श्वभूमीवर आ. यशोमती ठाकूर यांनी नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.के. मिश्रा व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याशीदेखील संवाद साधला. वाघाला त्वरित जेरबंद करा अथवा ठार तरी करा, अन्यथा नागरिकांनी कायदा घेतल्यास ही जबाबदारी शासनाची राहील, अशा इशारा आ. यशोमती ठाकूर यांनी दिला.

टॅग्स :Tigerवाघ