शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
5
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
6
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
7
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
8
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
9
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
10
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
11
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
12
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
13
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
14
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
15
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
16
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
17
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
18
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
19
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
20
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...

प्रेमप्रकरण उघडकीस येण्याच्या भीतीने षोडशीची आत्महत्या

By admin | Updated: April 9, 2016 00:01 IST

कुटुंबीयांसमोर प्रेमप्रकरण उघडकीस येण्याच्या भीतीने एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

महेंद्र कॉलनीतील घटना : मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी जप्त अमरावती : कुटुंबीयांसमोर प्रेमप्रकरण उघडकीस येण्याच्या भीतीने एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सायंकाळी महेंद्र कॉलनी परिसरात उघडकीस आली. मुलीने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली असून त्या चिठ्ठीतून आत्महत्येच्या कारणांचा उलगडा झाला आहे. मृत मुलगी महेंद्र कॉलनीत दोन बहिणी व आईसोबत राहत होती. तिचे विजय धोत्रे (२७, रा. महेंद्र कॉलनी) याचेसोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान गुरूवारी मृत मुलीच्या मधल्या बहिणीचा आरोपी विजय विश्वनाथ धोत्रे याचेसोबत वाद झाला. विजय हा लहान बहिणीची नेहमीच छेड काढतो, असे मृताच्या दोन्ही बहिणींचे म्हणणे होते. त्यामुळे दोन्ही बहिणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरूध्द तक्रार नोंदविण्यास गेल्या. त्यावेळी लहान बहीण घरी एकटीच होती. पोलिसांनी दोन्ही मुलींच्या तक्रारीच्या आधारे विजय धोत्रेविरुध्द भादंविच्या कलम ३५४ व पोस्को कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आणि अटकही केली. ही बाब षोड्शीला कळताच आता आपले प्रेमप्रकरण कुटुंबीयांसमोर उघडकीस येणार, या भीतीने तिने घरातच ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यावेळी मृत मुलीने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. चिठ्ठीत तिने विजयशी प्रेमसंबंध असल्याचे नमूद करून माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नसल्याचे लिहिले आहे. त्यामुळे प्रेमसंबंध उघड होण्याच्या भीतीने १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)