शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

धक्कादायक! अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या अंडा बराकीत शिरला कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:14 IST

गणेश वासनिक अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहातील अंडा बराकीत एक पुरुष बंदीजन कोरोना संक्रमित आढळला आहे. अतिसंरक्षित असलेल्या अंडा ...

गणेश वासनिक

अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहातील अंडा बराकीत एक पुरुष बंदीजन कोरोना संक्रमित आढळला आहे. अतिसंरक्षित असलेल्या अंडा बराकीत कोरोना शिरला कसा, याबाबत कारागृह प्रशासन चिंतातुर झाले आहे. आजमितीला कारागृहात १० पुरुष, तर एक महिला बंदीजन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे कारागृहात समूह संक्रमणाचा धोका वाढल्याचे बोलले जात आहे.

कोरोनाने येथील मध्यवर्ती कारागृहातही ‘एन्ट्री’ केली आहे. आजमितीला एकूण ११ बंदीजन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात एक बंदीजन येथील शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. नऊ बंदीजन येथील होमगार्डच्या विभागीय कार्यालयात साकारलेल्या कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेत आहेत तसेच एक महिला बंदी शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या मुलींच्या वसतिगृहातील कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा हैदोस वाढला आहे. फेब्रुवारीत कोरोना संक्रमिताची वाढती संख्या बघता, जिल्हा प्रशासनाने २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान ‘लॉकडाऊन’ जाहीर केला होता.

दरम्यान, पॉझिटिव्ह रुग्ण आणि मृतांची संख्या कमी होण्याचे चिन्हे दिसून येत नसल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पुन्हा ८ मार्चपर्यंत ‘लॉकडाऊन’ घोषित केला आहे. कारागृहात कोरोना नियमावलींचे कोेटेकाेर पालन होत असताना अंडा आणि सामान्य बराकीत प्रत्येकी एक असे दोन बंदीजन बाधित आढळले आहे. १ मे २०२० ते ३१ जानेवारी २०२१ या दरम्यान कारागृहात १६५ कैदी संक्रमित आढळले होते. त्यापैकी एक कर्मचारी, एक कैदी असे दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

-------------------

नवीन कैदी १४ दिवस क्वारंटाईन

न्यायालयाच्या आदेशानुसार, विविध गुन्ह्यांतील आरोपींची कारागृहात रवानगी झाल्यानंतर हल्ली कोरोनाकाळात १४ दिवस संबंधित कैद्याला क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना चाचणीनंतर जुने कारागृहात रवानगी केली जाते. तरीही अंडा बराकीत कोरोना पोहाेचला कसा, ही बाब चिंतनीय ठरत आहे. येथील अंध विद्यालयात नव्या बंदीजनांसाठी क्वारंटाईन केंद्र साकारण्यात आले आहे.

-------------------

अंडा बराकीत पाकिस्तानी, बॉम्बस्फोटचे आरोपी, नक्षलवादी

अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे अंडा बराक अतिसंरक्षित आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून सात प्रवेशद्वार पार केल्यानंतर अंडा बराकीत जाता येते. अंडा बराकीत प्रसिद्ध खून खटल्यातील एका बंदीजनास कोरोनाने ग्रासले आहे. त्यामुळे अंडा बराकीत कोणामुळे कोरोनाचा संसर्ग पोहोचला, हे शोधून काढणे आव्हानात्मक आहे. हल्ली अंडा बराकीत पाकिस्तानी, बॉम्बस्फोटचे आरोपी, नक्षलवादी, देशद्रोही, प्रसिद्ध खून खटल्यातील आरोपी असे एकूण १० बंदीजन जेरबंद आहेत. अंडा बराकीची क्षमता १६ एवढी आहे.

------------------

बंदीजनांची नियमित सर्दी, खोकला, तापाची तपासणी केली जाते. अंडा बराकीत कोरोना संक्रमित कैदी आढळून आल्याने चिंता वाढली आहे. कारागृहातून बाहेर बंदी जात नाही. किंबहुना अंडा बराकीत कर्मचारी संपर्कातून कोरोना पोहोचला असावा. त्या दिशेने चाचपणी केली जात आहे.

- एफ.आय. थोरात, वैद्यकीय अधिकारी, अमरावती मध्यवर्ती कारागृह