शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कृषी विद्यापीठात दिल्या ‘प्रमोटेड कोविड-१९’ गुणपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 17:59 IST

बी.एस्सी.नंतर एम.एस्सी.मध्ये प्रवेश अथवा मोठ्या संस्थांमध्ये नोकरीच्यावेळी प्रमोटेड कोविड-१९ गुणपत्रिका डाग लावणारी ठरणार आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांमध्ये नाराजी प्रथम, द्वितीय, तृतीय सेमिस्टर गुणपत्रिकेवर नोंद

गणेश वासनिकलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात कृषी विद्यापीठातील बी.एस्सी. प्रथम, द्वितीय व तृतीय सत्राच्या विद्यार्थ्यांना ‘प्रमोटेड कोविड-१९’ असे अंकित असलेल्या गुणपत्रिका वितरित करण्यात येणार आहेत. यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून, कोरोना डाग लागल्याची खंतदेखील व्यक्त करण्यात येत आहे. सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षाकरिता गुणपत्रिका देण्यात येणार आहे.राज्य शासनाने कृषी पदवी विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येतील, तर उर्वरित सत्राच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केले जाईल, असा निर्णय घेतला होता. त्यानुसार बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, मराठवाडा कृषी विद्यापेठ परभणी, तर अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या चारही कृषी विद्यापीठांनी बी.एस्सी. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या आहेत. उर्वरित सत्राला प्रवेशित विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता बढती दिली आहे. यात कृषी, उद्यान विद्या, कृषी जैवतंत्रज्ञान, वनविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी अभियांत्रिकी अन्न तंत्रज्ञान या शाखांच्या विद्यार्थ्यांना प्रमोटेड कोविड-१९ गुणपत्रिका वितरित करण्यात येणार आहेत. कृषी विद्यापीठांनी गुणपत्रिकाह्णचे फार्मेटसुद्धा महाविद्यालयांना पाठविले आहे. मात्र, ही गुणपत्रिका बी.एस्सी. कृषी पदवीधर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात कायम शल्य ठरणार आहे.हा तर शैक्षणिक पात्रतेचा ऱ्हासकृषी पदवी विद्यार्थ्यांना प्रमोटेड कोविड-१९ गुणपत्रिका देणे म्हणजे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा ऱ्हास होय. यात अभ्यासू विद्यार्थ्यांची प्रचंड हानी झाली आहे. एकाच रांगेत सगळे विद्यार्थी गणल्या जात आहे. बी.एस्सी.नंतर एम.एस्सी.मध्ये प्रवेश अथवा मोठ्या संस्थांमध्ये नोकरीच्यावेळी प्रमोटेड कोविड-१९ गुणपत्रिका डाग लावणारी ठरणार आहे. मूल्यांकन नसेल तर विद्यार्थी कसा घडेल, ऑफलाईन परीक्षा घेता येत नाही, किमान असायमेंट घ्यायला हवी, अशी खंत अकोला येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी अनिकेत पजई यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.कृषी विद्यापीठाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना प्रमोटेड कोविड-१९ गुणपत्रिका वितरित करण्यात येणार आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. व्हायवा ऑनलाईन पार पडला आहे. महाविद्यालयातून सुमारे २४० विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका वितरित केल्या जाणार आहेत.- शशांक देशमुख, प्राचार्य, श्री. शिवाजी कॉलेज ऑफ हॉर्टिक्लचर, अमरावती.

टॅग्स :examपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र